Tarun Bharat

वाळू तस्करांनी धावत्या ट्रॅक्टर मधून कोतवालास ढकलले

आटपाडीतील धक्कादाय घटना

आटपाडी : आटपाडी येथे मान नदीतून अवैध्य वाळू चोरी करताना पकडलेल्या ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन येत असताना वाळू तस्करांनी धावत्या ट्रॅक्टर मधून कोतवाला ढकलून दिले सोनार सिद्ध मंदिराच्या डाव्या बाजूला ओढ्यात हा प्रकार घडला. यामध्ये कोतवाल पोपट वाघमारे जखमी झाले. शुक्रवारी पहाटे तीन वाजे दरम्यान ही घटना घडली.

याप्रकरणी प्रमोद तात्यासाहेब पुजारी या वाळू तस्करा विरोधात दिघंचीचे मंडळ अधिकारी अरुण साळुंखे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

मंडळ अधिकारी अरुण साळुंखे, तलाठी एस.के.कुमार, कोतवाल डी. बी मुलानी, पोपट वाघमारे यांचे पथक अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी शुक्रवारी पहाटे आटपाडी सोनार सिद्ध परिसरात वस्तीवर होते. यावेळी पिंपरी खुर्द येथील जाधव मळ्याजवळ पुलाच्या उजवीकडील बाजूस देशमुख वाडी हद्दीतील मान नदीच्या पात्रात पथकाला ट्रॅक्टर व अंदाजे एक ब्रास वाळूने भरलेली ट्रॉली दिसली.

हे ही वाचा : जादूटोणा करण्याची भीती घालून महिलेला ५० हजाराचा गंडा

पथकाने चालकास ट्रॅक्टर व ट्रॉली तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले चालक प्रमोद पुजारी यांच्यासोबत कोतवाल पोपट वाघमारे ट्रॅक्टर मध्ये बसले. तहसील कार्यालयाकडे जाताना सोनार सिद्ध मंदिराजवळ पुजारीने वाघमारे यांना ट्रॅक्टर मधून ढकलून देत बोंबेवाडी गावच्या दिशेने पळ काढला.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related Stories

सांगली : मिरजेच्या तरुणाचा निर्घृण खून

Archana Banage

Sangli : मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना फटका; मिरज तालुक्यात सर्वाधिक पाऊस

Abhijeet Khandekar

घरफोडी करणारी टोळी अटक

Archana Banage

कोल्हापूर : कासेगावात कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Archana Banage

Sangli : पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून

Abhijeet Khandekar

मनपा समाजकल्याण समितीत वादंग

Archana Banage