जत , प्रतिनिधी
जत येथील एस. टी. कॉलनीत भाड्याच्या खोलीत रहात असलेला बिलाल मेहबूब शेख (वय २८, रा. मूळ गाव बागेवाडी) याने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात घर मालक आजाद गुलाबहुसेन मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे. मयत तरूण हा जत मध्ये वॉचमन म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आधिक तपास पोलीस नाईक हाक्के करीत आहेत.