सांगली/प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगलीतर्फे दिला जाणारा नाट्य पंढरी सांगलीचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यंदा सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
रंगभूमीदिनाचे औचित्य साधून आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे पुरस्कार देऊन सन्मानित करणेत येत असते. यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक, अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले व करीत असलेले सतीश आळेकर यांना जेष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांचे शुभहस्ते विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करणेत येईल.
गौरवपदकाचे स्वरूप गौरवपदक, रोख रक्कम 25 हजार स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. अशी माहिती समितीचे प्रमुख डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. समिती ८० वर्ष नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे ५ नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पद्मश्री सतीश आळेकर यांचा परिचय
(जन्म: १९४९)
नाटककार, दिग्दर्शक, नट, पटकथा लेखक शिक्षण: एम. एस्सी. (जीवरसायनशास्त्र) पुणे विद्यापीठ १९७२
थिएटर अकादमी, पुणे (१९७३) हया संस्थेचे संस्थापक सदस्य, संस्थेचे 1973 ते १९९२ या काळात व्यस्थापन.
१९७२ ते १९९६ बी.जे. मेडीकल कॉलेज, पुणे येथे संशोधन अधिकारी, १९९६ ते २००९ मधे पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक. २००९ मधे निवृत्त. सप्टेंबर 2013 पासून पुणे विद्यापीठात Distinguished Professor (ख्यातनाम प्राध्यापक) म्हणून नियुक्ती.
फोर्ड फ़ॉडेशन, दिल्ली, भारत भवन, भोपाळ, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली, विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली, गोवा कला अकादमी, पणजी आदि संस्थांशी सल्लगार नात्याने वेळोवेळी संबंधीत.
नाट्यलेखन: मिकी आणि मेमसाहेब (१९७३), महानिर्वाण (१९७४), महापूर (१९७५), बेगम बर्वे (१९७९), शनवार-रविवार (१९८२), दुसरा सामना (१९८९), अतिरेकी (१९९०), पिढीजात (२००३), एक दिवस मठाकडे…. (2011), ठकीशी संवाद (२०२१)
एकांकिका : १) झूलता पूल व इतर एकांकिका (झूलता पूल, मेमरी, भजन, सामना) १९७३, २)
भिंत, वळण (१९८२) ३) दार कोणी उघडत नाही, बसस्टॉप (१९८५) ३) आधारित एकांकिका (२०११) चित्रपट लेखन: जैत रे जैत (पटकथा संवाद) १९७७, कथा दोन गणपतरावांची (संवाद) १९९७ टेलेव्हिजन मालिका: देखो मगर प्यारसे (हिंदी, १३ भाग) दिग्दर्शन १९८५ (दूरदर्शन दिल्ली करिता) लघुपट दिग्दर्शन: हमाल पंचायत (१९७९)
नाट्य-दिग्दर्शन : मिकी आणि मेमसाहेब (१९७३), महानिर्वाण (१९७४), बेगम बर्वे (१९७९), शनिवार-रविवार (१९८२), अतिरेकी (१९९०), अभिनय: (नाटक) महानिर्वाण, बेगम बर्वे, शनवार रविवार, अभिनय: (मराठी चित्रपट) यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची, आक्रित, उंबरठा, एक होता विदुषक, देवी अहिल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कथा दोन गणपतरावांची, सखी माझी, चिंटू, चिंटू -2, होवून जाऊ द्या वूई आर ऑन, आजचा दिवस माझा, म्हैस, हाय-वे, राजवाडे एन्ड सन्स, मि शिवाजी पार्क, व्हेनटीलेटर, स्माईल प्लीज, भाई: व्यक्ती कि वल्ली मालिका: पिंपळपान, नूपुर इत्यादी.
अभिनय: (हिंदी चित्रपट) ये कहानी नहीं, अय्या, देख तमाशा देख, महाराट्र राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार (रु. ५ लाख) (२०१२) पद्मश्री (हस्ते मा. राष्ट्रपती.) (२०१२) जीवनगौरव पुरस्कार, अखील भारतीय मराठी नाट्य परीषद मध्यवर्ती शाखा, मुंबई, (२००६) अखिल भारतीय नाट्य परिषद (नाशिक) तर्फे वि.वा. शिरवाडकर नाट्य लेखन पुरस्कार (२००५) नाट्यलेखनासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद (मुंबई) यांचा राज्य शासन पुरस्कार (२००५) पुणे विद्यापीठातर्फे प्राचार्य व्हि. के. जोग स्मृति आदर्श शिक्षक पुरस्कार (२००४) पिढीजात नाटकासाठी महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार (१९९२) नांदिकार सन्मान, कलकत्ता (१९९४) नाटक संगीत अकादेमी, दिल्ली यांचा राष्ट्रीय नाट्यलेखन पुरस्कार (१९७५) ‘महानिर्वाण’ नाटकासाठी राम गणेश गडकरी राज्य शासन पुरस्कार
आंतरराष्ट्रीय सन्मानवृत्ती: (१९८३) एशियन कल्चरल कॉन्सील (रॉकफेलर फ़ॉंडेशन, न्यूयॉर्क) न्यूयॉर्क येथे तीन महिने रंगभूमि अभ्यास दौरा (२००३) फुलब्राईट शिष्यवृत्ति (न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटी येथे तीन महिने प्राध्यापक पद) आंतरराष्ट्रीय अतिथी प्राध्यापकः (१९९६) ड्युक यूनिव्हर्सिटी (अमेरिका), (२००३) टीश स्कूल ऑफ आर्ट्स, न्यूयॉर्क युनीव्हर्सिटी, (२००५) यूनिव्हर्सिटी ऑफ़ जॉर्जीया (अमेरिका) येथे प्रत्येकी चार महिने. (2006-2011) ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ या विभागास सर रतन टाटा ट्रस्ट मार्फ़त मिळालेल्या ‘अनुदान प्रकल्पाचे संचालक. अनुदानामधुन संगीत, नृत्य, नाट्य विषयांची एकूण नऊ सैंद्धांतीक पाठ्यपुस्तके प्रकाशित.