विटा पोलिसांची कामगिरी
विटा प्रतिनिधी
सांगली व सातारा जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना विटा पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केले. त्यांच्याकडून सात लाख 45 हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या. विशाल पाटील, महेश शामराव वीर दोघेही रा. शाहूनगर, विटा अमृत राजेंद्र काळोखे रा. साळशिंगे रोड विटा, राहुल गजानन जाधव, शामरावनगर-सांगली अशी अटक केलेल्या चार संशयित नावे आहेत.
सांगली व सातारा जिल्ह्यातील विटा, संजयनगर, सांगली, वडूज, मसवड व कराड त्यांनी दुचाकी चोरल्या होत्या. माऊली तालुका खानापूर येथील शब्बीर चंदुलाल तांबोळी यांची दुचाकी दिनांक 13 मे रोजी मध्यरात्री त्यांच्या घरातून चोरीस गेली होती. या चोरीचा तपास सुरू असताना पोलिसांना दुचाकी चोरल्याचे नावे समजली. हे चोरटे बसस्थानक परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र भिंगारदेवे यांनी पोलीस पथकाने सापळा लावून अटक केली.