सांगली : प्रतिनिधी
भाजपकडून मिळालेल्या पक्ष प्रवेशाच्या ऑफरच्या चर्चेबाबत कॉंग्रेस नेते, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आज खुलासा केला. मी कोणताही वेगळा विचार करत नसून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत रहावे असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
“काही लोकांचा माझ्यावर फोकस आहे, त्यामुळे काही चर्चा घडवून आणल्या जात आहेत मात्र एक नक्की सांगतो…कोणतीही वेगळी भूमिका मी घेणार नाही किंवा कोणत्याही वेगळ्या विचारात मी नाही…कॉंग्रेसच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे.” असे बोलताना त्यांनी सांगितले . पलूस तालुक्यातील अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना विश्वजित कदम यांनी हा खुलासा केला