Tarun Bharat

मिरजेत फळ विक्रेत्याला मारहाण करून रोकड लंपास

Advertisements

प्रतिनिधी /मिरज

शहरातील मिरज-पंढरपूर रस्त्यावर आंबे विक्रेत्याला व त्याच्या मुलाला लोखंडी पट्टीने मारहाण करुन दोन हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली. याप्रकरणी राजू मनोहर गायकवाड (वय 50, रा. समतानगर, आठवी गल्ली, मिरज) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

राजू गायकवाड आणि त्यांचा मुलगा आदित्य गायकवाड हे दोघे मिरज-पंढरपूर रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर आंबे विक्रीसाठी थांबले होते. यावेळी एक अज्ञात तरुण आंब्याच्या टेंपोजवळ आला. त्याने गायकवाड यांना न सांगताच एक आंबा उचलून खाल्ला. गायकवाड यांनी आंबे महाग आहेत, का खाल्लास, असे विचारले असता संबंधीत अज्ञात तरुणाने तू कोण विचारणार, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच खाल्लेला आंबा या जागेचे भाडे समज, असे म्हणून लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आदित्य यालाही लोखंडी पाईपने मारहाण केली. बाप-लेकांना मारहाण करुन जखमी केल्यानंतर संबंधीत अज्ञात तरुणाने गायकवाड यांच्या आंब्याच्या स्टॉलवरील पैशांचा गल्ला उखडून त्यातून दोन हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पळून गेला.

Related Stories

चीनला आणखी एक झटका; जपान चीनमधून परत आणणार 57 कंपन्या

datta jadhav

पहिल्या शनिवारी ‘एक तास राष्ट्रवादी’साठी हा उपक्रम राबवा- मंत्री जयंतराव पाटील

Archana Banage

रंगमंच पूजनाने नाटयगृह सुरू

Archana Banage

क्रूझ ड्रग्ज प्रकरण हा भाजपचा कट: नवाब मलिक

Archana Banage

सातारा हाफ हिल मॅरेथॉन मध्ये धावताना कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू

Archana Banage

बदली कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातून नोकरी द्यावी – मडावी

Archana Banage
error: Content is protected !!