Tarun Bharat

Sangli : विषारी औषध पिऊन बेळंखीत शेतकऱ्याची आत्महत्या

जत, प्रतिनिधी

जत तालुक्यातील बेळुखी येथे शेतकऱ्याने नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. श्रीकांत आबासो शिंगाडे (वय ३५, व्यवसाय शेती ) असे त्याचे नाव आहे.

मध्यरात्री त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पहाटे शव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पहिल्यांदा कर्जास कंटाळून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्याचे कुठेही कर्ज प्रकरणच नसल्याने कर्ज कारण रद्द झाल्यानंतर खरे कारण नातेवाइकातीलच एका महिलेशी संबंध होते. ती बाहेरगावी गेल्याने तिची भेट झाली नसल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Stories

सांगली : वाकुर्डे योजनेचे पाणी उर्वरित शेतीस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आ. सदाभाऊ खोत

Archana Banage

”पलूस कडेगाव येथील प्रादेशिक वन विभागात वनरक्षकच बनले वनभक्षक”

Abhijeet Khandekar

सांगलीत गोवा स्टाईल कॅसिनो आणि लॉटरी सेंटरच्या संघर्षातून गँगवॉर

Archana Banage

महाशिवरात्रीनिमित्त हरिपूर, सागरेश्वर, कुकटोळी, सांगलीत दर्शनासाठी गर्दी

Abhijeet Khandekar

सांगली : बुधगाव पाणीप्रश्नी पालकमंत्र्यांना साकडे

Archana Banage

माजी आमदार संभाजी पवार अनंतात विलिन

Archana Banage