Gram Panchayat Election Result 2022 Live: सांगली जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायत साठी मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला असून, मिरज तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर एका ग्रामपंचायतमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. बेडग येथे उमेश पाटील यांचे पॅनल आघाडीवर आहे तर सोनी येथे बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील शिराळा, वाळवा- इस्लामपूर पलूस, कडेगाव, तासगाव कवठेमहांकाळ जत आटपाडी खानापूर- विटा, मिरज या तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. मिरज तालुक्यातील पदमाळे येथे काँग्रेसचे संग्राम पाटील यांच्या पॅनेलने आघाडी घेतली असल्याचे सांगण्यात आले.
-जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील यांच्या गावात त्यांची आसंगी जत येथे एक हाती सत्ता.
बेडग ग्रामपंचायतीत उमेश पाटील लोकनियुक्त सरपंच विजय
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मिरज तालुक्यातील बेडग ग्रामपंचायतचा निकाल नुकतासाठी हाती आला आहे. भाजप पक्षातील दिग्गज नेत्यांनी निवडणुकीत एकमेकांसमोर दंड ठोकून प्रतिष्ठापणा लावल्याने बेडग ग्रामपंचायतीचा निकाल अत्यंत उत्कंठा वर्धक होता. मतमोजणीनंतर उमेश पाटील गटाला पाच जागांसह लोकनियुक्त सरपंच पदावर विजय मिळाला. गटप्रमुख उमेश पाटील हे लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. तर विरोधी परशुराम नागरगोजे गटाचे नऊ सदस्य निवडून आले. तर बापूसाहेब बुरसे गटातील दोन सदस्य विजयी झाले.
-शिराळा तालुक्यात १३ ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून, राष्ट्रवादी ११ भाजप २ व अपक्ष 1
– राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर
-आळसंदमध्ये अजित जाधव यांचे परिवर्तन पॅनेल विजयी.
-खटाव थेट सरंपच पदी ओंकार पाटील 106 मतांनी विजयी.
-पुणदी – सरपंच भाजपा आणि पँनेल काँग्रेसचे.
नागेवाडीत राष्ट्रवादी विजयी
अर्चना अण्णासे भोसले 297 मतांनी विजयी
कांचन सुनिल भोसले-239 मतांनी विजयी


previous post
next post