शाखाधिकारी गोरख पाटील यांची माहिती
शिराळा : चांदोली परिसरात आज शुक्रवारी दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याची रिश्टर स्केल वर २.८ एवढी नोंद झाली असून परिसरात यामुळे कोणतेही नुकसान न झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वारणावरती शाखेचे शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली.
आज शुक्रवारी दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी हा धक्का चांदोली व परिसरात जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू चांदोलीच्या पश्चिमेला २७.२ किलोमीटर अंतरावर होता. हा धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे परिसरात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही अशी माहिती शाखा अधिकारी पाटील यांनी दिली.