Tarun Bharat

नांद्र्यात भीषण अपघात; २ ठार, ५ जखमी

नांद्रे/प्रतिनिधी

नांद्रे. ता. मिरज. येथील सांगली-नांद्रे राज्यमार्ग वरील नांद्रे येथील दर्गाह चौक येथे भीषण अपघात झाला. हा अपघात आज मध्यराञी सुमारे १.३० वाजता महिंद्रा जीप एम. एच. २२ बी ८२३१ या जीप मधून एकूण सात तरूण मध्यराञी सांगलीहून खटावकडे भरधाव वेगाने जात असताना ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने दर्गाह समोरील बाहुबले यांच्या घरासमोरील लोखंडी पोलवर जीपने जोरदार धडक दिली. यामध्ये लोखंडी पोल वाकवत गाडी फरफटत जाऊन दर्ग्याच्या भिंतीवर अदळली. हा अपघात इतका भिषण होता की जिपवरील टप एका बाजूस निघून पडला. धडक इतकी जोरात होती की, यामध्ये दोन २१ वर्षाचे तरूण राहणार खटाव हे जागीच ठार झाले. तर इतर ५ जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

म्युकर मायकोसिसने महिलेचा मृत्यू

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगची दहशत; यांची झाली हत्या…

Kalyani Amanagi

सांगली : मनसेतील राजीनामा नाट्यावर अखेर पडदा

Archana Banage

उपनिरीक्षकांसह सहा पोलीसांना कोरोना

Archana Banage

सांगली : ड्रेनेजसह ३५६ कोटींच्या योजनांचा आढावा घेणार

Archana Banage

बांग्लादेशातून बनावट नोटांची तस्करी, पुण्यात तिघांना अटक

datta jadhav
error: Content is protected !!