Tarun Bharat

Sangli : शेगावात चार दुकाने जळून खाक; २० लाखांचे नुकसान

जत, प्रतिनिधी

जत तालुक्यातील शेगाव येथे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बस स्टँड परिसरातील दुकान गाळ्यातील चार दुकानांना अचानक आग लागून यात चार दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात पंडीत विठ्ठल माने यांनी फिर्याद दिली आहे. माने यांचे निरंकार बेकरी व वडापाव दुकान आहे. त्यांचे चार लाखांचे नुकसान झाले आहे. या दुकाना शेजारी संभाजी शिंदे यांचे वसंत इलेक्ट्रॉनिक नावाने इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानासही आग लागली. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर विजय तांबवे यांच्या मोबाईल शॉपी दुकानातील मोबाईल व साहित्य असे आठ लाख रूपये नुकसान झाले आहे. एकुण चार दुकानांचे २० लाखाचे नुकसान झाले आहे. आधिक तपास हवलदार गोडसे करीत आहेत.

Related Stories

लोकसेवकांची भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास संपर्क साधा – पोलीस उप अधीक्षक

Abhijeet Khandekar

पत्रकार मारहाण प्रकरणी माजी सरपंचासह तिघांना अटक

Archana Banage

आमदार पडळकर करणार मंत्रालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन

Archana Banage

सांगली जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर राज्यापेक्षा जास्त

Archana Banage

Khashaba Jadhavऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांना गुगलकडून अभिवादन

Abhijeet Khandekar

सांगली : आरग येथे मोटारसायकलीच्या धडकेत वृध्द ठार

Archana Banage