Tarun Bharat

Sangli; एक हजारांची लाच स्विकरताना आरोग्य अधिकारी लाचलुचतच्या जाळ्यात

जत / प्रतिनिधी

जत तालुक्यातील बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा जत शहरातील नामांकित वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रमोद मारुती कांबळे यांना एक हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी केली. डॉ. कांबळे यांनी वैद्यकीय उपचारासाठी दोघांकडून पैशाची मागणी केली होती. दरम्यान, या कारवाईमुळे जतच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गेल्याच आठवड्यात जत पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर लाच प्रकरणी कारवाई झाली होती. त्यानंतरची ही दुसरी कारवाई आहे. जत येथील डॉ. कांबळे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून बिळूर आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत.

येथील एक तक्रारदार आणि त्याच्या मित्राकडे डॉ. कांबळे यांनी वैद्यकीय उपचारासाठी एकाकडून सातशे आणि तीनशे रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित तक्रारदारांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

त्यानुसार लाचलुचपतचे अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी बिळुर येथील आरोग्य केंद्रात सापळा लावण्यात आला होता. तक्रारदारांकडून उपचाराचे एक हजार रूपये स्वीकारताना डॉ. प्रमोद कांबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

Sangli; वाळवा तालुक्यात नाग बाळगल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

बैलगाडी शर्यतीला नाकाबंदीचे आदेश : आमदार पडळकरांचे टिकास्त्र

Archana Banage

सांगली : ओबीसी आरक्षण ठरल्याशिवाय निवडणुका होवू देणार नाही – चंद्रकांत पाटील

Archana Banage

विशेष शिबीरे घेऊन गोसावी समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली काढावा

Abhijeet Khandekar

सांगली : उमदी जवळ बोर नदीपात्रात मुलगा बुडाला

Archana Banage

इस्लामपुरातील बनावट दस्त प्रकरणी दोघांना सक्तमजुरी

Archana Banage