Tarun Bharat

Sangli; संजयनगरमधील गुंडाचा भोकसून खून

Advertisements

सांगली / प्रतिनिधी

संजयनगर येथील गुंड तुकाराम सुभाष मोटे (27) याचा  खून करण्यात आला आहे. किरकोळ कारणातून हा खून झाला असून मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी दोघा संशयिताना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तुकाराम मोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोलपंपावर उधार पेट्रोल दिले नाही म्हणून याठिकाणी असणाऱ्या महिलेचा विनयभंग करुन तिला मारहाण केली होती. तसेच पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी  अटक ही केली होती. त्यानंतर तो जामिनावर मुक्त झाला होता. मंगळवारी संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन वाद झाला आणि त्यातूनच हाणामारी झाली. या हणामारीत तुकारामला चाकूने भोसकण्यात आले. त्याला तीन ठिकाणी खोलवर वार झाल्यामुळे तुकाराम जागीच मृत झाला. संजयनगर पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक निरिक्षक संजय क्षीरसागर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले आहे.

Related Stories

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकासाठींच्या तारखा आज होणार जाहीर

Abhijeet Khandekar

मंत्र्यांचे अधिकार सचिवांना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

Rahul Gadkar

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उद्यापासून सुरुवात

datta jadhav

… तर 2 एप्रिलला लॉकडाऊन लावावा लागेल : अजित पवार

Rohan_P

हैदराबाद विमानतळावर 11 प्रवाशांकडून जप्त केले 1.66 कोटींचे सोने

Rohan_P

सांगली : गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग आज पासून पुर्ववत सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!