Tarun Bharat

Sangli; इस्लामपूरचा ‘अजिंक्य’ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 424 वा

इस्लामपूर प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत इस्लामपूरचा अजिंक्य बाबुराव माने याने देशातील गुणवत्ता यादीत 424 क्रमांक पटकावला आहे. सोमवारी निकाल जाहीर झाला. त्याच्या या घवघवीत यशाचे परिसरातून कौतुक होत आहे त्याचा यशाबद्दल इस्लामपुरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

अजिंक्य याचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील नेर्ले असून गेली तीन वर्षे तो यूपीएससीची परीक्षेची तयारी करत होता. तिसऱया प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. यशाबद्दल बोलताना अजिंक्य माने म्हणाला, आपल्या यशात आई-वडील यांचे प्रोत्साहन, मोठे दोन भाऊ यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले. अभ्यासक्रमाचा सातत्यपूर्ण सखोल अभ्यास, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नाची जाण, विशेष करून ऑप्शनल विषय ( समाजशास्त्र ) याचा अधिक गंभीरपणे केलेला अभ्यास यामुळे यश प्राप्त झाले. अभ्यासाची तयारी केल्याने निकाल अपेक्षित होता. प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्तम देशसेवा करण्याची संधी मिळाल्याने आनंदी आहे. अजिंक्यचे माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात आदर्श बालक मंदिर येथे तर बी. ई. मेकॅनिकल आर. आय. टी. राजारामनगर येथे झाले आहे. एन. आय.टी. सूरत येथे एम टेक पदवी पूर्ण करून काही वर्षे नोकरीही केली होती. अजिंक्य यांच्या आई सौ. विजया माने व वडील बाबुराव माने हे शिक्षक आहेत,एक भाऊ यू पी एस सी च्या घेण्यात आलेल्या इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस मध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत, दुसरे बंधू जर्मनीत मोठ्य़ा कंपनीत अधिकारी आहेत.

Related Stories

जिल्ह्यात पावसाचे थैमान

Archana Banage

देशात मागील 24 तासात कोरोनाचे 37,593 नवे रूग्ण, 648 मृत्यू

Tousif Mujawar

महाराष्ट्रातील कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनाही कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी बिगुल वाजले

Abhijeet Khandekar

केंद्रिय कर्मचाऱ्यांना आता लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी : आशिष शेलार

Tousif Mujawar

सांगलीच्या दिव्यांग असलेल्या काजल कांबळेने वजीर सर करत घडविला इतिहास

Archana Banage