Tarun Bharat

कवठेमंकाळ तालुक्यात पावसाचे जोरदार बॅटिंग; तलाव तुडुंब भरून वाहू लागले

Sangli Rain Update: कवठेमंकाळ तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रायवाडी, रांगोळी व कुच्ची हे तलाव पाण्याने पूर्ण भरले आहेत.तालुक्यात सर्वात जास्त पाणीसाठा क्षमता असलेला बसपा वाढीचा तलाव ८१ टक्के भरला आहे.

कवठेमंकाळ तालुक्यातील पूर्व भाग दुष्काळ पट्टा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न सतावत असतो. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या भागात वरदान ठरलेला दुधी भावी तलाव सध्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला आहे. तालुक्यातील सर्वात जास्त पाणीसाठा क्षमतेचा बसापवाडी तलाव हा सुद्धा 81 टक्के भरला आहे. उच्च व नागोळी तलाव शंभर टक्के भरले आहेत. पावसामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असले तरी पावसाने भाजीपाला व डाळिंब बागायत यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. द्राक्ष बागांच्या छाटणीसाठी शेतकरी पावसाच्या उघडीपची प्रतीक्षा करीत आहेत.

Related Stories

सांगली : विट्यासाठी आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडा : आमदार अनिल बाबर

Archana Banage

मणेराजुरीत एक युवक व दोन युवतींचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ

Archana Banage

सांगलीत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

Archana Banage

सांगली : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पाच हजाराहून अधिक प्रकरणे निकाली

Archana Banage

Solapur : हुलजंतीत लाखो भाविकांच्या उपस्थित गुरू शिष्य भेट सोहळा संपन्न

Abhijeet Khandekar

सांगली : पलूस पालिका निवडणुकीसाठी लवकरच प्रभाग रचनेचे काम सुरु होणार

Archana Banage