Tarun Bharat

आंबा महोत्सवाचे वसंतदादा मार्केट यार्ड येथे 17 मे अखेर आयोजन- जिल्हा उपनिंबधक

सांगली प्रतिनिधी

जिल्हा उपनिंबधंक सहकरी संस्था सांगली, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर, व सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्या सयुंक्त विदयमाने आंबा महोत्सवाचे आयोजन पदमभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृतिभवन वसंतदादा मार्केट यार्ड सांगली, येथे करण्यात आले आहे. हा आंबा महोत्सव 17 मे अखेर सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी चालू राहणार आहे. या महोत्सवामध्ये प्रामुख्याने हापूस, केशर, पायरी व बिटका आंबा या जातीचा आंब्याची वाजवी दरात विक्री होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा उपनिंबधक निळकंठ करे यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार वेताळ, पोलिस उपअधिक्षक अशोक वीरकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, अथणी शुगरचे संचालक डॉ.वंसतराव जुगळे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उर्मिला राजमाने, बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, पुंडलिक गडदे, प्रसाद भुजबळ, व प्रतिक गोनुगडे व बाजार समितीचे आधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी निळकंठ करे म्हणाले, “महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राबवित असलेल्या उत्पादक ते ग्राहक या थेट विक्री या योजनेचे कौतूक करून हापूस आंबा ग्रामीण भागापर्यंत या महोत्सवाच्या माध्यमातून पोहचला पहिजे.”

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकूमार वेताळ यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राबवित असलेल्या आंबा महोत्सव हा उपक्रम स्तुतीयोग्य असून कोकणातील आंबा उत्पादक शेतक-यांनी आशा आंबा महोत्सवामध्ये मोठया प्रमाणात सहभागी होवून त्यांचा फायदा घ्यावा, तसेच सांगली शहरातील ग्राहकांनी या आंबा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी डॉ. सुभाष धुले यांनी आंबा उत्पादकांनी क्यूआर कोड सारख्या आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करणे गरजेचे असलेचे मत व्यक्त केले. तसेच डॉ. जुगळे यांनी कोकणातील शेतक-यांचे आर्थिक चक्र हे आंबा या पिकावर अवलंबून असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी अशा आंबा महोत्सवास मोठ्या प्रमाणात सहभागी होणे आवश्यक आहे असे सांगितले. आभार बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी मानले.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात 12 बळी, 702 पॉझिटिव्ह

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये आज २० कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

‘मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय’; राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंगांची प्रतिक्रिया

Archana Banage

तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनं पुणे हादरलं,चुलत दिराकडून वहिनीसह दोन चिमुकल्यांची हत्या

Archana Banage

उद्धव ठाकरे तुम्ही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेला नाही, सत्ता येते जाते : मुख्यमंत्र्यांना दिला भावाने इशारा

Abhijeet Khandekar

सांगली : राजेवाडी तलावावर पर्यटन फुल्ल,सोशल डिस्टन्सिंगचा उडतोय फज्जा

Archana Banage
error: Content is protected !!