Tarun Bharat

Sangli; म्हैसाळ आत्महत्याप्रकरणी २५ सावकारांवर गुन्हा

13 जणांना अटक, अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके; म्हैसाळ कृष्णा तीरावर सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार; म्हैसाळ गावचा पोलीस पाटीलच निघाला खाजगी सावकार

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत पंचवीस खासगी सावकारांची नावे निष्पन्न केली आहेत. या सर्व सावकारांवर खाजगी सावकारी अधिनियम आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 पैकी 13 खासगी सावकारांना गजाआड करण्यात आले असून, अन्य सावकारांच्या शोधासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटक येथे पोलिसांची सात पथके रवाना झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान रात्री दीड वाजता म्हैसाळ येथे कृष्णा तिरावर सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या सावकारमध्ये नंदकुमार रामचंद्र पवार ( वय ५२, रा. म्हैसाळ), राजेंद्र लक्ष्‍मण बन्ने (वय ५०), अनिल लक्ष्मण बन्ने (वय ३५, दोघे रा. नरवाड), खंडेराव केदारराव शिंदे (वय ३७, रा. मारुती मंदिर जवळ म्हैसाळ), डॉ. तात्यासो अण्णाप्पा चौगुले (वय ५०, रा. शिंदे रोड. म्हैसाळ), शैलेंद्र रामचंद्र धुमाळ (वय५६, रा. बंगला रोड, म्हैसाळ), प्रकाश कृष्‍णा पवार (वय ४५, रा. बेडग), संजय इराप्पा बागडी (वय ५१, रा. देवल कॉलनी शेजारी म्हैसाळ), अनिल बाळू बोराडे (वय ४८, रा. म्हैसाळ) पांडुरंग श्रीपती घोरपडे (वय ५६, रा. सटवाई गल्ली म्हैसाळ), विजय विष्णू सुतार (वय 55, रा. म्हैसाळ), शिवाजी लक्ष्मण कोरे (वय 65) आणि रेखा तात्यासो चौगुले (वय 45, रा. म्हैसाळ) या तेरा जणांचा समावेश आहे. तर आशु शैलेंद्र धुमाळ, अनाजी कोंडीबा खरात, शामगोंडा कलगोंडा पाटील, सतीश सखाराम शिंदे, शिवाजी नामदेव खोत, गणेश ज्ञानू बामणे, सुभद्रा मनोहर कांबळे, नंदकुमार रामचंद्र धुमाळ, राजेश गणपत राजेश गणपती होटकर, अण्णासो तातोबा पाटील, नरेंद्र हनुमंतराव शिंदे, आणि पोलीस पाटील महादेव वसंत सपकाळ अशा बारा सावकारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोधासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटक येथे पोलिसांची सात पथके रवाना झाली आहेत. या सावकारांमध्ये दोन महिलांसह म्हैसाळ गावातील पोलीस पाटलाचाही समावेश आहे.

वरील खाजगी सावकारांकडून वनमोरे बंधूंनी व्याजाने पैसे घेतले होते. पैशांच्या वसुलीसाठी संबंधित सावकारांकडून वनमोरे कुटुंबीयांची वारंवार बदनामी करण्यात येत होती. तसेच जातीवाचक बोलून त्यांची मानहानी करण्यात येत होती. पैशांच्या वसुलीसाठी तगादा लावून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या खाजगी सावकारांच्या पाशाला कंटाळून वनमोरे बंधूंनी आपल्या कुटुंबियांसह विषारी औषध प्राशन करून सामूहिक आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसाना मिळालेल्या चिठ्ठीत 25 सावकारांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यानुसार पोलिसांनी २५ जणांवर खाजगी सावकारी अधिनियम आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये म्हैसाळ आणि परिसरातील काही प्रतिष्ठित उच्चभ्रू व्यक्तींचा आहे. तसेच गावातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेला पोलिस पाटीलच खाजगी सावकार निघाला आहे. याशिवाय प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ञ, बेकरी व्यावसायिक, फर्निचर दुकानदार, अनेक नामवंत पतसंस्थांचे चेअरमन, संचालक आणि हॉटेल व्यवसायिक यांचाही समावेश आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या सावकारी पाशात अडकून एकाच वेळी दोन कुटुंबाने आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे.

Related Stories

शरद पवारांना ‘आयकर’ विभागाची नोटीस

Rohan_P

75 टक्के मुक्ती गाठलेल्या सातारा जिल्ह्यात नव्याने 21 बाधित

Abhijeet Shinde

दुर्गम भागात ड्रोनद्वारे लसपुरवठा

Patil_p

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये

datta jadhav

Chiplun Flood : नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु – विजय वडेट्टीवार

Abhijeet Shinde

एका दिवसात तब्बल 10 हजार रुग्ण बरे

Patil_p
error: Content is protected !!