Tarun Bharat

सांगली जिल्हा हादरला; कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

तालुक्यातील म्हैसाळ येथे डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घराजवळ तीन मृतदेह मिळून आले. दरम्यान, सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

अधिक वाचा- गुप्तधनाच्या अमिषापोटी आत्महत्या केल्याचा संशय

Video पहासांगली जिल्हा हादरला : कुटुंबातील ९ जणांची सामूहिक आत्महत्या

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौकालगतच्या मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहण्यास आहेत. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर येथे दुसरे घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचे दरवाजे उघडत नव्हते. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत येथील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या या घटनेमुळे सांगली जिल्हा हादरला गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Related Stories

मुख्यमंत्री येडियुरप्पा पुढील आठवड्यात दिल्ली दौर्‍यावर

Abhijeet Shinde

कोरोनाचा कहर : दिल्लीत मागील 24 तासात 5, 100 नवे रुग्ण

Rohan_P

राज्य नाटय़ स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर ‘नेटवर्क 24/7′ प्रथम

Sumit Tambekar

मागिलवर्षी भारतात दररोज सरासरी 86 बलात्कार…दर तासाला 49 महिलांवर गुन्हे दाखल

Abhijeet Khandekar

जिल्ह्यातील गायरान अतिक्रमणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सकारात्मक भेट

Abhijeet Shinde

‘यूएईत’ होणार आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!