Tarun Bharat

Sangli; मिरजेत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

सट्टेबाजीतून आत्महत्या केल्याचा संशय

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

शहरातील मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या सचिन शांतीनाथ लिंबीकाई (वय ३२) या तरुणाने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र त्याने सट्टेबाजीत कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे. तरुणाच्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सचिन हा रविवारी दुपारी एका हॉटेलवर मित्रांबरोबर जेवण करून घरी आला. आई कामाला गेली होती. तर पत्नीचे ऑपरेशन झाल्यामुळे ती दुसर्‍या खोलीमध्ये झोपलेली होती. सचिन याने तिसर्‍या खोलीत जावून दोरीने गळफास घेतल्याचे त्याच्या पत्नीला दिसले. सचिनच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्याने अवैध सट्टेबाजीतून कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याची चर्चा होती. मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.

Related Stories

ईडीची देशभरात १८ ठिकाणी छापेमारी

Abhijeet Shinde

सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

datta jadhav

काका राज ठाकरेंपाठोपाठ आदित्यने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

वारणा धरणात १७.४३ टीएमसी पाणीसाठा

Abhijeet Shinde

करमाळेत बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू

Abhijeet Shinde

बायडेन प्रशासनात ‘महिला राज’

datta jadhav
error: Content is protected !!