Tarun Bharat

मिरजेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Advertisements

प्रतिनिधी/मिरज

शहरातील सांगलीकर मळा परिसरातील ऑक्सिजन पार्क येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये तरुणाचा मृतदेह गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या स्थितीत मिळून आला आहे. स्वप्नील कृष्णराव घस्ते (वय 32, रा. मालगाव रोड, दत्त कॉलनी, मिरज) असे मयत तरुणाचे नांव आहे. मालगांव रस्ता येथे राहण्यास असतानाही ऑक्सिजन पार्कमध्ये त्याने आत्महत्या का केली? याबाबत मिरज शहर पोलीस तपास करीत आहेत. आत्महत्येबाबत पोलिसात नोंद झाली आहे.

ऑक्सिजन पार्क येथे इमारतींचे नवीन बांधकाम सुरू आहे. यापैकी एका इमारतीमध्ये सकाळी स्वप्नील घस्ते या तरुणाचा मृतदेह आत्महत्या केल्याच्या स्थितीत दिसून आला. रात्रीच्या सुमारास या तरुणाने आत्महत्या केल्याचे समजते. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर मिरज शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, सदर तरुण हा मालगाव रस्त्यावरील दत्त कॉलनी येथे राहण्यास होता. तरीही त्याने सांगलीकर मळा परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आत्महत्या का केली असावी? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले. या घटनेची मिरज शहर पोलीस ठाण्यात आत्महत्या अशी नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

सांगली : मिरजेत दोनशे वर्षांपूर्वी आला चहा; सन १७९९च्या पत्रात उल्लेख

Abhijeet Shinde

शहीद पोलिस स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ाची रूग्णसंख्या दहा हजार पार

Abhijeet Shinde

सांगली शहरातील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदले

Abhijeet Shinde

सांगली : सासपडे खून प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला कोरोनाची बाधा

Abhijeet Shinde

बेडग येथे घर फोडून रोकड, दागिने लंपास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!