Tarun Bharat

sangli-आमदार अनिल बाबर यांना पत्नीशोक, शोभा बाबर यांचे अल्पश: आजाराने निधन

Advertisements

विटा- खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिलराव कलजेराव बाबर यांच्या पत्नी सौ. शोभा बाबर(६२) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आमदार अनिलभाऊ, तसेच माजी नगरसेवक अमोल बाबर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर ही दोन मुले, दीर, जावा, पुतणे असा मोठा परिवार आहे. गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र बुधवारी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खानापूर मतदार संघातील जनतेवर मायेची पाखर घालणाऱ्या काकी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून शोभाकाकी यांना फुफ्फुसाचा त्रास होत होता. प्रारंभी त्यांना विटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुणे येथिल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर होती. परंतु त्यानंतर यांच्या प्रकृतीत चढ उतार होते.

आमदार अनिल बाबर हे शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत. मुलगा अमोल, सुहास आणि स्वतः आमदार अनिल बाबर हे देखील त्यांच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार अनिलभाऊ बाबर यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. दरम्यान शोभा काकी यांच्या निधनाने संपूर्ण खानापूर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.
आज सायंकाळी अंत्यसंस्कार
सौ बाबर यांच्यावर आज सायंकाळी विटा आणि गार्डी च्या सीमेवर असलेल्या पवई टेक परिसरातील जीवन प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने खानापूर मतदार संघातील जनतेवर मायेची पाखर घालणाऱ्या काकी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Stories

…’या’नंतर महाविद्यालये सुरू होणार – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

चिंता वाढली : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख पार

Rohan_P

लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब ?; उद्या घोषणा होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात बुधवारी लसीकरण नाही

Abhijeet Shinde

लोकसभेत आज अंमली पदार्थ विधेयकावर चर्चा

Sumit Tambekar

मोहालीत इंटेलिजन्स ब्युरोच्या इमारतीवर रॉकेटसदृश्य हल्ला

datta jadhav
error: Content is protected !!