Tarun Bharat

Sangli; हातगाडी चालकाचा खून गाडीला ओव्हरटेक करण्याच्या वादातून

सांगली प्रतिनिधी

शंभर फुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंपनजीक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या समोरच्या बाजूला असणाऱ्या माऊली एग्ज जंक्शनच्या हातगाडी मालकाचा खून गाडीला ओव्हरटेक मारण्याच्या वादातून झाला आहे. मयत संतोष तुकाराम पवार (28, रा. मोती चौक, सांगली) याच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर तिघे बालअपचारी आहेत. मंगळवारी या संशयितांना जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासअधिकारी पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्यामध्ये आकाश सचिन शिंदे वय 19 व्यवसाय सेट्रींग रा. 50 फुटी रोड आजना मस्जिदसमोर सांगली, वैभव राजू शिंदे (23, रा.जयसिंगपूर जि. कोल्हापूर) , निहाल बशीर नदाफ (23 रा. उदगाव, जि. कोल्हापूर) , अकिब सरफराज नदाफ (20, रा. उदगाव जि. कोल्हापूर) आणि सकवान जमील बागवान (21, रा. असी. मस्जिद 100 फुटी रोड सांगली) अशी नावे आहेत. याशिवाय तिघे बालअपचारी आहेत. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, संकेत मगदूम, संदीप पाटील, संदीप गुरव, दीपक गायकवाड आर्यन देशिंगकर, सोहेल कार्तियानी ही अटकेची कारवाई केली.

रविवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास शंभरफुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंपाच्या नजीक असणाऱ्या माऊली एग्ज जंक्शन याठिकाणी आकाश शिंदे आणि त्याचे साथीदार आले आणि त्यांनी माऊली एग्जचे मालक संतोष पवार याच्याशी वादावादी सुरू केली. तसेच एकमेकांकडे पाहण्याची धमकी देत असतानाच संतोष पवार याच्या हातगाड्य़ाचे मोठय़ाप्रमाणात नुकसान करण्यात आले. त्यावेळी याला विरोध करत असतानाच आकाश शिंदे यांनी त्याच्याकडील चाकूसारख्या धारदार शस्त्राने संतोष पवार याच्या पोटात तो घुसविला. त्यामुळे संतोष तडफडत बाजूला गेला त्याचवेळी दुसरा वार त्याच्या खालोखाल पोटात त्यांने घुसविला आणि या वारामुळे तो खाली पडला. हा वार इतका वर्मी होता की, संतोष पवार बेशुध्द पडला होता. त्यानंतर याठिकाणच्या शेजाऱ्यांनी तात्काळ जखमी संतोषला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात आणले पण तत्पुर्वीच तो मयत झाला होता.

या खुन्याचा तात्काळ शोध सुरू पाच तासात संशयित अटकेत
दरम्यान संतोष पवार याचा खून झाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि विश्रामबाग पोलीसांच्याकडून तात्काळ खून्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला हा खून आकाश शिंदे आणि त्याच्या साथीदारांने केल्याची माहिती मिळताच त्याला अटक करून त्याच्या साथीदारांनाही तात्काळ पकडण्यात आले आहे. यामध्ये एकूण आठजणांचा सहभाग असल्याचे समोर आल्यावर त्यांनी तात्काळ या आठही जणांना ताब्यात घेतले. पण, यातील तिघे बालअपचारी असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. तर त्यांना फक्त ताब्यात घेण्यात आले. इतर पाच जणांच्यावर अटकेची कारवाई केली.

गाडी ओव्हरटेक मारल्याच्या रागातून खून
काही दिवसांपूर्वी सांगलीत एस. टी. स्टँडसमोर संशयित आकाश शिंदे आणि मयत संतोष पवार यांच्यात गाडी ओव्हरटेक केल्याने वादावादी झाली होती. त्यावेळी संतोष पवार यांने संशयित आकाश शिंदेला त्याचठिकाणी दोन कानाखाली वाजविल्या होत्या. तो राग आकाश शिंदेच्या मनात होता. तसेच रविवारीही हे दोघे एकमेकांसमोर आल्याने संतोषने त्याच्याकडे रागाने बघितल्याने आकाश शिंदेने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेवून त्याच्या मित्राच्या सहाय्याने हा खून केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Related Stories

सांगली : टाकळीत आरोग्य सेविकांना दमदाटी

Archana Banage

मिरज कृष्णाघाट येथे पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांना काढले बाहेर

Archana Banage

राजस्थानातील करौलीत हिंसाचार, 42 जखमी

datta jadhav

Budget 2023 : भारत बाजरीचे जागतिक केंद्र बनवणार-निर्मला सीतारामन

Archana Banage

नागालँडमध्ये कुत्र्याच्या मांस खरेदी-विक्रीस बंदी

datta jadhav

उद्धव ठाकरेंकडे प्रचंड वैचारिक दिवाळखोरी

datta jadhav