पलूस : प्रतिनिधी
खासदार सुप्रिया सुळेंबद्दल चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद सदस्य शरद लाड नेतृत्वाने पलूस तालुका राष्ट्रावादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी ‘चंद्रकांत पाटलांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय’ अशा आरोळ्या देऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा निषेध केला. महिलांच्या उपकारावर निवडून आलेल्या चंद्रकांत पाटलांनी एका महिलेबाबत केलेले हे वक्तव्य लाजिरवाणे आहे आणि याचा समस्त महिलांकडून निषेध ही करण्यात आला. भाजप पक्षाने या त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि महिलांची जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षा पूजा लाड यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाध्यक्षा पूजा लाड, विनायक महाडिक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा नंदाताई पाटील,इंद्रजित पवार, युवतीच्या अध्यक्षा प्राजक्ता जाधव, पी एस माळी, जे पी पाटील, रावसाहेब गोंदील, ऍड रोहित कांबळे, राहुल जगताप, सागर शिंदे, स्वप्नील पाटील, गिरीश पोवार, रुपाली येसुगडे, पूनम नलवडे, सविता पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.