Tarun Bharat

मालगाव येथे मोटरसायकल अपघातात एकजण जागीच ठार

Advertisements

मिरज / प्रतिनिधी

तालुक्यातील मालगाव येथे झालेल्या मोटरसायकल अपघातात सामाजिक कार्यकर्ते शितल बाबासो जत्ते (वय ४७) हे जागीच ठार झाले. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मालगाव लक्ष्मीनगर येथे नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिम बाजूस हा अपघात झाला. याबाबत मयत शितल यांचे भाऊ संतोष चारुदत्त जत्ते (वय ४३) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, सुशांत रावसाहेब तारदाळे उर्फ छोटू पुजारी (रा. मलगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सुशांत तारदाळे उर्फ छोटू पुजारी हा मोपेड ॲक्टिवा मोटारसायकल (एमएच-१०-सीई-4292) वरून शितल जत्ते यांना सोबत घेऊन जात होता. मालगाव गावच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरून छोटू हा भरधाव वेगात मोटारसायकल चालवत होता. मोटरसायकल महामार्गाच्या पश्चिम बाजूस आली असता तेथे असलेल्या मातीच्या ढिगारावर चढली. त्यामुळे पाठीमागे बसलेले शितल जत्ते हे खाली पडून त्यांच्या डोक्याला मोठा दगड लागला. यामध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने जत्ते यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर छोटू याने जखमी जत्ते यांना रुग्णालयात दाखल करायचे सोडून तेथून पळ काढली. अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या भावाने घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून, मोटरसायकलस्वार छोटू पुजारी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

Sangli; जि.प.,पंचायत समिती आरक्षण सोडत स्थगित

Abhijeet Khandekar

मनपाच्या विषय समिती सभापती निवडी आज

Abhijeet Shinde

एसटी कर्मचारी संप : परिवहन मंत्र्यांच्या पुन्हा भाजप नेत्यांशी चर्चा

Sumit Tambekar

सीमाप्रश्नी अमित शहांची भेट घेणार – खा. संजय काका पाटील

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना बाहयरुग्णांची माहिती लपवल्यास डॉक्टरांवर कारवाई

Abhijeet Shinde

Sangli; मणेराजूरीनजीक वारकऱ्यांना घेवून जाणारा टेम्पो उलटला, शिराळ्याचे वारकरी जखमी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!