Tarun Bharat

Sangli : कृष्णेची पाणीपातळी वाढणार; महापालिकेकडून नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना

Advertisements

सांगली : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत झाली आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन काही धरणांतून विसर्ग सुरू आहे. कोसळणारा पाऊस आणि धरणातून होणार पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णा नदिच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेकडून नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

सध्या कृष्णेची पाणी पातळी ३० फुट आहे. मसळधार पाऊस आणि कोयना, वारणा, राधानगरी या धरणातून सुरु असलेला विसर्ग यामुळे पातळीत वाढ होण्याची शक्य आहे. वाढत्या पाण्यामुळे कृष्णेची पाणीपातळी ३५ फुटावर जाण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली महापालिकेकडून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अलमट्टी धरणाचा विसर्ग आणखी वाढवणार असल्याचे देखिल पाठबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या अलमट्टी धरणातून 2 लाख 25 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Related Stories

बुधगावच्या मंदिर, मशिदीत चोरी करणारा जेरबंद

Abhijeet Shinde

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Abhijeet Shinde

नवाब मलिक यांना वानखेडेविरोधातील पुरावे प्रकाशित करण्यापासून रोखण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Sumit Tambekar

कामगाराने उद्योजकाला घातला २० लाखाला गंडा: कुपवाड एमआयडीसीतील प्रकार

Abhijeet Shinde

मिरजेतील ट्रीमिक्स रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दंड

Abhijeet Shinde

सांगली : अन्यथा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन – पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!