हातनूर / वार्ताहर\
तासगाव तालुक्यातील विसापूर येथील शिवाजी विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत उत्तम माने (वय-४०) यांचा मोटर सायकल वरून पडून अपघाती मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडेनऊच्या दरम्यान राजापूर ते विसापूर मार्गावर पांदी मळ्या जवळ घडली. या अपघाताची तासगाव पोलिसांत पोलीस पाटील संदीप पाटील यांनी माहिती दिली.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. प्रशांत माने हे पांदी मळा येथे राहतात. ते काल सायंकाळी पत्नीला माहेरी बोरगावला सोडण्यासाठी गेले होते. रात्री साडेनऊच्यानऊ च्या दरम्यान परत ते गावाकडे येत होते. यावेळी राजापूर फाटी पासून एक किलोमीटर अंतरावर पांदी मळा जवळ श्री. माने गाडीवरून पडले. ही माहिती सकाळी लोकांना फिरायला गेल्यावर समजली.
यानंतर तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे उपनिरीक्षक श्री केराम यांनी घटनास्थळी भेट दिली. काही नातेवाईकांबरोबर चर्चा केली. यानंतर पोलिसांना सूचना देऊन मृतदेह पोस्टमार्टम साठी तासगाव ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवला.
प्रशांत माने हे डॉन या नावाने गावात सर्वांना परिचित होते. सामाजिक कार्यात झोकून देऊन निरपेक्ष भावनेनें काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता होता.रेशनिंग घोटाळा, ग्रामपंचायत घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. महिन्यभरापूर्वीच त्यांची येथील श्री शिवाजी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांच्यावर आज विसापूर येथे अंतीम संस्कार करण्यात आले.