Tarun Bharat

तासगावात जुन्या वादातून एकाचा खून

शिवनेरी मंडळाच्या अनिल जाधव यांचा समावेश

तासगाव : शहरातील धवळवेस येथील शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांचा तलवारीने वार करुन खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ च्या दरम्यान घडली. या प्रकाराने तासगावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांचा शोध रात्री उशिरा पोलीस घेत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ढवळवेस येथील काही तरुणांमध्ये कोणत्यातरी जुन्या कारणावरून वाद धुमसत होता. यातून बाचाबाची ,शिवीगाळ, बघून घेण्याची भाषा वापरली जात होती. हा वाद मिटवण्यासाठी शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव व अन्य काही तरुण होते. रात्री साडे नऊ च्या दरम्यान ढवळवेस येथील चौकात थांबले होते. यावेळी अचानक आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने डोक्यात वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याचा ते प्रतिकार करू शकले नाहीत. घाव वर्मी लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना तासगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र ते उपचारादरम्यान मयत झाले.

घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा तपास सुरू केला. हल्ल्याची माहिती मिळताच शेकडो तरुणांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती. या घटनेने तासगावात एकच खळबळ उडाली आहे.

Related Stories

खंडेराजुरीत शेतकरी महिलेच्या घरावर सशस्त्र दरोडा

Archana Banage

मालगाव येथे मोटरसायकल अपघातात एकजण जागीच ठार

Abhijeet Khandekar

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कोरोनाचे दोन बळी

Archana Banage

पीएनजी चषक ऑनलाईन स्पर्धेचा विजेता इराणचा अली फागीर नवाज

Archana Banage

यशवंतराव चव्हाणांच्या स्मारकाचा निर्णय नाहीच; जागा मालकांचा तीव्र विरोध

Archana Banage

सांगली : पलूस येथे बैलगाडी बंदी उठवण्यासाठी शर्यतीप्रेमींनी काढला मोर्चा

Archana Banage