Tarun Bharat

Sangli; ट्रक-दुचाकी अपघातात जुनेखेडचा एक ठार

पत्नी गंभीर जखमी; पुणे-बेंगलोर अशियाई मार्गावरील घटना

इस्लामपूर / प्रतिनिधी

पुणे-बेंगलोर अशियाई महामार्गावर पेठ हद्दीतील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर ट्रक-मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथील रियाज हुसेन पठाण हे ठार झाले. तर पत्नी रशिदा या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

रियाज व रशिदा यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. मासे खरेदी करण्यासाठी हे दोघे कराड येथे गेले होते. मासे खरेदी करुन परतत असताना पेठ हद्दीतील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर त्यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.10 टी ८२२५ ला पाठीमागून येणाऱया ट्रक नं. एम. एच. १२ टी.व्ही. ६७३८ ने जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर ते दोघे ही गाडीवरुन पडून जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे उपचारासाठी नेण्यात आले. रियाज यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर रशिदा यांना उजव्या पायाच्या मांडीस गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कासीम ईस्माईल पठाण (३२ रा.मोप्रे ता.कराड, जि.सातारा) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दिली आहे.

Related Stories

सांगली : महिन्यात पाच लाखांवर नागरिकांचे लसीकरण करणार

Archana Banage

सराटी तलाव फुटून शेतीचे नुकसान

Archana Banage

सरकार आमदारांच्या मागण्यांबाबत गंभीर नाही : आ. गोपीचंद पडळकर

Archana Banage

सांगली: महापालिकेकडून पुस्तक बँक सुरू

Archana Banage

सांगली : कवलापुरच्या जमिनीची किरीट सोमय्या यांनी केली पाहणी; पोलिसांची तारांबळ

Archana Banage

सलग दुसऱ्या दिवशी हिसडा टोळीचा दणका; 90 हजाराचे पळवले मंगळसूत्र

Archana Banage