Tarun Bharat

विनापरवाना उत्खनन प्रकरणी 22 शेतकऱ्यांना 29 कोटी आठ लाखाचा दंड

40 हजार 993 ब्रास दगड व मुरूम उत्खनन; दंड न भरल्यास शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चढणार बोजा

पंढरपूर प्रतिनिधी

विना परवाना सुमारे 40 हजार 993 ब्रास इतक्मया दगड आणि मुरुमाचे उत्खनन करुन परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी पेहे (ता. पंढरपूर) येथील 22 शेतकऱयांना महसूल विभागाने सुमारे 29 कोटी आठ लाख 700 रुपये दंड केला आहे. दंडाची रक्कम सात दिवसात भरावी, अन्यथा संबंधित शेतकऱयांच्या सात बारा उताऱयावर महसूल विभागाची थकबाकी म्हणून बोजा चढवण्यात येईल, अशा नोटीस देण्यात आली आहेत. महसूल विभागाच्या नोटीसनंतर येथील शेतकऱयांचे धाबे दणाणले आहेत.

पेहे येथे मागील वषी अनेक शेतकऱयांच्या शेतातून बेकायदेशीर दगडाचे उत्खनन करुन तो खडीक्रेशरसाठी वापरण्यात आला होता. तर मुरुम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आला होता. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित शेतकऱयांच्या शेतात जावून पंचनामे केले होते. त्यावेळी सुमारे 40 हजार 993 ब्रास दगड आणि मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर महसूल विभागाने कारवाई करत शेतकऱयांना दणका दिला आहे.

पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी संबंधित 22 शेतकऱ्यांना नोटीसी काढल्या असून त्यामध्ये दंडाची रक्कम सात दिवसांच्या आत भरावी, अन्यथा जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असेही नमूद केले आहे. येथील शेतकऱयांना दंडाच्या नोटीस मिळाल्यानंतर शेतकऱयांमध्ये खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर दगड आणि मुरुम उत्खननप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी महसूल विभागाकडे तक्रारी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे खुलासे समाधानकारक नसल्याने दंडाचे आदेश
पेहे येथील उत्खननाबाबत तक्रारी आल्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी यांना पाठवून तेथील पंचनामे केले. शेतकऱयांना नोटीसाही पाठविल्या. त्यानंतर त्या शेतकऱयांच्या दोन ते तीन सुनावण्याही घेण्यात आल्या. परंतु शेतकऱयांकडून समाधानकारक खुलासे आले नसल्याने दंडाचे आदेश दिले आहेत.
सुशील बेल्हेकर
तहसिलदार, पंढरपूर

Related Stories

पंतप्रधान मोदी आज बंगाल-ओडिशाचा दौरा करणार

Amit Kulkarni

तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar

ताडोबा सफारीसाठी गेलेल्या महिला पर्यटकाचा मृत्यू

prashant_c

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1243 वर 

Tousif Mujawar

सोलापूर : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सुमारे ७९ लाख दंड वसूल

Archana Banage

एलन मस्क यांनी का रद्द केला ट्विटर खरेदी करार?

datta jadhav