Tarun Bharat

शिराळा पोलिसांकडून एका महिन्यात दुसरी आंतरराज्य टोळी जेरबंद

तालुक्यातून शिराळा पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव

शिराळा : वार्ताहर

शिराळा पोलीसांनी उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीला जेरबंद करुन त्यांच्या कडून ८ लाख ८२ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका महिन्यात शिराळा पोलिसांनी दुसरी आंतरराज्य टोळी जेरबंद केल्याने तालुक्यातून शिराळा पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

याप्रकरणी दयाशंकर नंदकुमार निनाद (वय ३८) मुळगावं रेंगणा, ता. बिंदकी, जिल्हा फतेहपुर, सध्या रा. शिराळा, रामसरण रामआचरे (वय ३१), रा. रेंगणा मजरे, चांदपुर, ता.बिंदकी जिल्हा फतेहपुर, सध्या रा.शिराळा, रामनारायण सुखलाल निनाद (वय ३९) रा.कोरवल धौरहरा ता. बिंदकी, जिल्हा फतेहपुर, विश्वंबर रामलखन निशाद (वय२९) रा .गजइपुरता, बारा. बिंदकी, जिल्हा फतेहपुर, देसराज जियालाल निशाद (वय ४५) रा. महाता ता. बागुआ, जिल्हा फतेहपुर‌, हुकुमचंद श्रीरामदीन निनाद रा. रेंगणा ता. बिंदकी जि. फतेहपुर राहणार सर्व उत्तरप्रदेश संतोष ऊर्फ कमलकांत निरंजन नायर (वय ३७) रा.बिरजपूर ता. गुबूडा जि. गोंजाम, राज्य ओरीसा (सर्वांचा व्यवसाय भंगार खरेदी विक्री) यांना शिराळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. सदर संशयित आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता. त्या सर्वांना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत अमोल शामराव माळी (वय३५) रेडीयन्ट फॅसिलिटीज प्रो.लि.पुणे रा.भडकंबे (ता. वाळवा) यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, अपरपोलीस अधिक्षक मनिषा डुबूले, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, सहायक पोलिस उफनिरीक्षक शिवाजी पाटील, पोलीस हवालदार महेश साळुंखे, राजेंद्र माने, दिपक खोमणे, पोलीस नाईक अमर जाधव, नितीन यादव, माणिक पाटील, शरद यादव, यांनी सदर कारवाई केली.

शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दिनांक १५ रोजी सायंकाळी ६.३० ते शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी १० घ्या दरम्यान करमाळे येथील इंटस टाॅवरच्या शटरचे कुलूप तोडून त्यामधील बॅटरी बॅंकअप मधील एकूण ३६ बॅटरी चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास पोलीस हवालदार राजेंद्र माने यांच्याकडे होता. त्यानुसार शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक बिऊर गावच्या हद्दीत गस्त घालत असताना. उतर प्रदेश पासिंगची महींद्रा एक्स यु व्ही क्रमांक युपी १६ एके ६८५६ हि गाडी पंक्चर अवस्थेत उभी असल्याचे गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी सदर लोकांच्याकडे चौकशी केली असता तर उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यावेळी गाडी तपासली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या बॅटरी सेल पैकी काही बॅटरी सेल व चारीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे निदर्शनास आली.

यावेळी सदर चोरट्यांनी गाडी सोडून शेजारच्या ऊसाच्या फडात पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिऊर येथील पत्रकार विजय पाटील, पोलीस पाटील सीताराम पाटील, सागर पाटील (चेअरमन) , पोपट पाटील, पंडीत पाटील यांच्या सहकार्याने सदर संशयितांना जेरबंद केले.

यावेळी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या कडून २,४६,१४४ रुपये किंमतीच्या मोबाईल टाॅवर बॅटरी सेल, ६ लांख रुपये किंमतीची चार चाकी गाडी, २४५० रुपये किंमतीची चोरी करता वापरलेली हत्यारे, १४००० किमतीचे मोबाईल, व २० हजार रुपये किंमतीची पाण्यातील विद्युत मोटर असा एकूण ८ लाख ८४ हजार ५४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलिस हवालदार राजेंद्र माने करत आहे.

Related Stories

युजीसी-नेट चे नवीन वेळापत्रक जाहीर

Archana Banage

न्यूझीलंड : पर्यावरणीय आणीबाणी घोषित

Omkar B

कोल्हापुरात आणखी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

देशात पहिल्यांदाच CRPF महिला कमांडो पथक; ‘या’ VIP ना देणार संरक्षण

Archana Banage

सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा 1 जुलैपासून

Tousif Mujawar

मुंबईत पोलिसांना धमकी; अजित पवार म्हणाले, धमक्यांना गांभिर्याने घेतलं पाहिजे

Abhijeet Khandekar