शिराळा : वार्ताहर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना लागणं झाल्यामुळे आज शिराळा न्यायालयात उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती त्यांचे वकील ॲड. रवी पाटील यांनी दिली. तर मनसेचे शिरीष पारकर व व जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना ही अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. यावेळी शिरीष पारकर हे शिराळा न्यायालयात हजर राहणार आहेत. परंतु मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत हे काही कारणास्तव न्यायालयात हजर राहू शकणार नाहीत. शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. सातपुते यांनी २८ एप्रिल २०२२ रोजी अजामिनपात्र वारंट बजावले आहे.
त्यामुळे ते तिघेही बुधवार दिनांक ८ रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शिरीष पारकर यांच्या सह दहा जनावर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावने, घोषणा बाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच २८,जानेवारी, २५जानेवारी,११फेब्रुवारी व २८एप्रिल २०२२ या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल यांच्यावर शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होते.
त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी शिराळा मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंतसह अन्य दहा जणांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १४३,१०९, ११७ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आरोपी क्रमांक ९ म्हणून राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर याना आरोपी क्रमांक दहा म्हणून सह आरोपी करण्यात आले होते.
राज्य शासनाकडून राजकीय आंदोलनातील अनेक गुन्हे मागे घेतले होते व हा देखील गुन्हा मागे घेतला जाईल अशी अपेक्षा होती. याबाबत राज ठाकरे यांचे पातळीवर प्रयत्न देखील करण्यात आले होते व परंतु अद्यापही ही केस कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून या केस मध्ये कोणीही आरोपी न्यायालयात फिरकले नव्हते म्हणून डिसेंबर २०२१ मध्ये सर्व दहा आरोपी विरुद्ध न्यायालयांनी वारंटचा हुकुम काढला होता. पहिल्या आठ आरोपीनी जानेवारी २०२२ मध्ये न्यायालयात अर्ज करून वारंट हुकूम रद्द करून घेतला होता. परंतु राज ठाकरे व शिरीष पारकर हे वारंट पोलिसांकरवी बजावणी होऊन देखील न्यायालयात हजर राहत नाहीत म्हणून दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांनाच या दोघांना का अटक केली नाही अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासाठी राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागणं झाली आहे. तर जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत हे काही कारणास्तव न्यायालयात हजर राहणार नाहीत. मात्र त्यांचे सहकारी शिरीष पारकर हे इतरांसह बुधवार दिनांक ८रोजी शिराळा न्यायालयात हजर राहणार आहेत. अशी माहिती त्यांचे वकील ॲड. रवी पाटील यांनी दिली.