Tarun Bharat

Sangli; सांगलीत पावसाची जोरदार वाऱ्यासह दमदार एंट्री; वातावरणात गारवा

Advertisements

सागंली प्रतिनिधी

सांगली शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाची दमदार एन्ट्री झाली आहे. सकाळपासून उकाड्याचे वातावरण होते. हवामान खात्याने अंदाज वर्तवल्या प्रमाणे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आज सांगली मध्ये ५:३० च्या सुमाराला पावसाने दमदार एंट्री केली.

सांगलीतील स्टेशन चौक, मारुती चौक आणि विस्तारित भागांमध्ये पावसामुळे पाणी साठवून राहिले नागरिकांना या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 6 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये नोंदवण्यात आली. यामध्ये मिरज 6 (7.1), जत 0.4 (23.8), खानापूर-विटा 0.0 (3.3), वाळवा-इस्लामपूर 0.0 (0.9), तासगाव 0.4 (1.3), शिराळा 0.0 (0.3), आटपाडी 0.0 (5.5), कवठेमहांकाळ 0.0 (7.6), पलूस 0.0 (0.१), कडेगाव 0.0 (5.6) पाऊस झाला आहे.

Related Stories

कुंडलमध्ये फोडला मंदिरातील प्राचीन शिलालेख

Abhijeet Khandekar

‘डेक्‍सामेथासोन’ कोरोनावर रामबाण औषध; मृत्यूदर घटविते

datta jadhav

मोरेवाडी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप; बरखास्तीची मागणी

Abhijeet Shinde

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde

सांगली : अभिनेते अमीर खान करमाळे येथे देणार भेट

Abhijeet Shinde

Kolhapur Rain Update: इचलकरंजीत जुना पूल पाण्याखाली; हुपरी मार्ग बंद होण्याची शक्यता

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!