Tarun Bharat

सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या, चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

कोकरूड : प्रतिनिधी

माणिकवाडी ता.वाळवा येथील विवाहिता हर्षदा सागर आटकेकर वय – 22 हिने सासरच्या छळास कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असून वडील नामदेव रामचंद्र शिंदे रा. मांगरूळ यांनी कोकरूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मांगरूळ येथील नामदेव रामचंद्र शिंदे यांच्या हर्षदा या मुलीचा विवाह माणिकवाडी ता.वाळवा येथील सागर जगन्नाथ आटकेकर याच्याशी झाला होता. पती सागर जगन्नाथ आटकेकर, सासू कमल जगन्नाथ आटकेकर, जयदीप जगन्नाथ आटकेकर (रा.माणिकवाडी) नणंद सोनाली (रा.केदारवाडी ) यांनी हर्षदा आटकेकरचा मानसिक, शारीरिक छळ सुरु केला होता तर पती सागर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सागर आटकेकरचे एका मुलीशी प्रेम संबंध असल्याचे तिला समजले होते. त्यामुळे तिने वाईट वाटून घेऊन विषारी औषध प्राशन केले. दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

याबाबत तिच्या वडिलांनी पती सागर जगन्नाथ आटकेकर, सासू कमल जगन्नाथ आटकेकर, जयदीप जगन्नाथ आटकेकर (रा.माणिकवाडी) नणंद सोनाली (रा.केदारवाडी ) या चोघांच्या विरोधात कोकरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अधीक तपास सपोनि ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

Related Stories

Sanjay Raut : संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर, 100 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर

Archana Banage

कोरोचीत एकाचा अहवाल निगेटिव्ह, आठ जण विलगीकरण केंद्रात दाखल

Archana Banage

दिलासादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदाच एकही रुग्ण नाही

Tousif Mujawar

इटलीचे शहर ‘वो’ जगासाठी आशेचा किरण

tarunbharat

महाराष्ट्रात 24 तासात 583 नवे कोरोना रुग्ण; 27 जणांचा मृत्यू

datta jadhav

Sangli; सांगलीत पावसाची जोरदार वाऱ्यासह दमदार एंट्री; वातावरणात गारवा

Abhijeet Khandekar