मणेराजूरी / वार्ताहर
मणेराजूरीत युवकाच्या झालेल्या खुनातील मुख्य संशयीत आरोपी लखन अशोक कांबळे ( वय ३२ ) याने द्राक्षबागेवरील विषारी औषध घेवून आत्महत्या केली आहे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. मृतदेहाशेजारी विषाची बाटली आढळली आहे.
गव्हाण रोडवरील मुख्य साठवण तलावा शेजारील पंपहाऊस जवळ लेखनाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलिसांच्या प्राथमिक पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी तासगांव ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, साहेबराव चंद्रकांत शिदगणेश ( वय ३७ ) या युवकाचा १५ जूलै रोजी किरकोळ कारणाने कुर्हाड व चाकूच्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. त्यातीलच लखन हा संशयीत आरोपी होता.