तासगाव प्रतिनिधी
लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तासगाव येथील श्री गणपती पंचायतन देवस्थान चा 243 वा ऐतिहासिक रथोत्सव अमाप उत्साहात व अलोट गर्दीत सुरुवात झाला आहे. या रथोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्तांनी उपस्थिती लावली असून गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया…च्या जयघोषात गणेशभक्त सात टन वजनाचा पारंपारिक ऐतिहासिक रथ हातानी ओढून या रथोत्सवाची शोभा वाढवत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे रथोत्सव स्थगित करण्यात आला होता. मात्र यावर्षी पुन्हा त्याच जोशात गुरुवारी रथोत्सव साजरा करण्यात आला. श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन व आदिती पटवर्धन यांनी तसेच प्रशासनाने यावेळी रथोत्सवाचे नियोजन केले होते.
या रथोत्सवासाठी कॅबिनेट मंत्री शंभुराजे देसाई, खा.संजय काका पाटील, रोहित दादा पाटील, प्रभाकर बाबा पाटील, तसेच प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रवींद्र रांजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलीस निरीक्षक संजीव झाडे आदी उपस्थित होते.