Tarun Bharat

मिरज पूर्वच्या वंचित भागाला मिळणार म्हैसाळचे पाणी

नवीन आरग-बेडग उपसा सिंचन योजनेस मान्यता, ११०० हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

मिरज पूर्व भागातील आरग लक्ष्मीवाडी बेडग नरवाड या गावातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या उंच टेकडीवरील ११०० हेक्‍टर क्षेत्राला नलिका वितरण प्रणाली द्वारे कायमस्वरूपी पाणी देण्याची योजना पाटबंधारे विभागाने आखली आहे. यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न करून प्रस्तावास मान्यता दिली आहे. आता लवकर काम सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

येथील गावांना जोडणारा हा भाग पठार या नावाने ओळखला जातो. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यापासून हा भाग उंचीवर आहे. उंच पातळीवरील अंदाजे ११०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या क्षेत्राला पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. मोहनराव शिंदे कारखान्याचे चेअरमन मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाने मागणी केली होती. या मागणीला यश आले. याच मुळे या भागातील शेतकऱ्यांनी पेठे आणि साखर वाटून व फटाक्याची आतशबाजी करून आनंद उत्साह साजरा केला.

Related Stories

सांगली : शंभर फुटी रोडवर मंडप गोडावूनला आग

Archana Banage

कुंबळे पुन्हा होणार टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक?

datta jadhav

मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची पित्याने कोर्टाबाहेर गोळ्या घालून केली हत्या

Archana Banage

लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह अन्य एकाचा खात्मा

datta jadhav

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये- जिल्हाधिकारी

Archana Banage

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपचे 8 बंडखोर आमदार सपामध्ये दाखल

datta jadhav
error: Content is protected !!