एसटी कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
इस्लामपूर / प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील जयंत पाटील यांनी थेट एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर थेट एसटीचा स्टेरिंग हातात घेऊन फेरफटका देखील मारला.
एसटीच्या ड्रायव्हर सीटवर जयंत पाटलांनी बसत स्टेरिंग हातात घेऊन एसटी चालवण्याचा अनुभव घेत एसटी चालकांसोबत संवाद साधला. इस्लामपूर आगारमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी येथील एसटी कर्मचाऱ्यांशी जयंत पाटलांनी संवाद साधला आणि त्यांच्याकडून असणाऱ्या अडचणी समस्या जाणून घेतल्या.
त्यानंतर पाटलांनी एसटीचीही माहिती घेत थेट एसटी बस चालवली ड्रायव्हर सीटवर बसून इस्लामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून जयंत पाटलांनी एसटीचे चालक बनून एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. यावेळी जयंत पाटील एसटी बस चालवत असल्याचं पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते.