Tarun Bharat

गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरच सोडवणार- महसूल मंत्री थोरात

Advertisements

पलुस प्रतिनिधी

मुंबई येथे गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्या चे निवेदन महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले. या वेळी सांगली जिल्ह्याचे नेते मा.बाळासाहेब गुरव जिल्हाध्यक्ष मा. सुनिल गुरव यांनी विविध मागण्याचे निवेदन दिले तसेच विविध समस्या वर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरव समाजाच्या सर्व मागण्यासाठी लवकरात लवकर बैठक बोलावून सर्व मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी प्रामुख्याने इनाम वर्ग 3 जमिनीस पिक कर्ज मिळणे बाबत, इनाम वर्ग 3 जमिनी गुरव समाजाच्या ताब्यात मिळावेत, कुटूंबप्रमुख मयत असलेल्यांना त्यांच्या वारसास वारसा हक्काने मिळावेत. घरबांधणी, पशुपालन व इतर व्यवसाय करण्यासाठी इनाम जमीन यातील प्रत्येक कुटुंबास उपलब्ध क्षेत्रातील दहा गुंठे जागा त्याच्या वैयक्तिक नावे नोंद करून मिळावी. जेणेकरून त्यावर नॅशनल बँकेचे कर्ज काढून घर बांधकाम व छोटे व्यवसाय करता येईल. महाराष्ट्रातील कलाकारांना आघाडी शासनाने मानधन दिले या महत्त्वपूर्ण निर्णयानेचे अभिनंदन करीत आहोत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील तुतारी वादक गुरव बांधवांचा समावेश करावा. असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच कोरोना काळात कलाकारांना दिलेले 5000 मानधन तुतारी वादक बांधवांना मिळावे अशी ही विनंती केली. गुरव समाजातील पाल्यांचे चालु शैक्षणिक वर्षाची शैक्षणिक फी माफ करावी. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष मा. सुनिल गुरव, मा. राहुल पाटील, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

सांगली : आटपाडी तालुक्यात 66 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

उत्तरप्रदेशात हेलिकॉप्टर कोसळले; प्रशिक्षणार्थी पायलटचा मृत्यू

datta jadhav

सांगली: गुंठेवारी चळवळ समितीच्या वतीने महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन

Abhijeet Shinde

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर

datta jadhav

“…तर गद्दारांना दोन लाथा घाला”, सुनील केदारांचं वादग्रस्त वक्तव्य

Abhijeet Shinde

दापोलीत मोरे नगराध्यक्षा तर रखांगे उपनगराध्यक्ष

Sumit Tambekar
error: Content is protected !!