Tarun Bharat

धक्कादायक! सांगलीत चोरट्यांनी फायरिंग करत ATM मशीन चोरले

Advertisements

सांगली: येथील कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यातील शिरढोणमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे ए.टी.एम.मशीन चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून, श्वान पथकाच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

https://tarunbharat.com/udayan-raje-angry-over-filming-at-lal-mahal/

याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी, मध्यरात्री फायरिंग करत चोरट्यांनी शिरढोण येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिनच बोलेरो गाडीतून उचलून नेले. भर वस्तीत असणाऱ्या एटीएम वर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात एकच खळबळ उडाली. शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हा दरोडा टाकला.कवठेमहांकाळ तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर (Ratnagiri-Nagpur) या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या शिरढोण गावात चोरट्यांनी भर वस्तीत धाडसी दरोडा टाकला. दरोडा टाकत असताना दुसऱ्या मजल्यावरील घरमालक अर्जुन विठ्ठलं निकम जागे झाले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने दगड टाकला. परंतु या चोरट्यानी त्यांच्या दिशेने फायरिंग केले. घरमालक निकम यांनी भितीने दार लावून घेतले. फायरिंग करताना गोळी दुसऱ्या दिशेने गेल्याने ते बचावले. तेवढ्यात या चोरट्यानी आपले काम फत्ते करत पलायन केले.

निकम यांनी या घटनेची माहिती तातडीने कवठेमहांकाळ पोलीस यांना रात्रीच दिली. या मशीनमध्ये पन्नास लाख रूपये असल्याची चर्चा सुरु आहे.चोरट्यांनी दुसरे मशिनही नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे घटनास्थळावरुन दिसून आले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख दिक्षितकुमार गेडाम, जत विभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले ,अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबल यांनी आज तातडीने भेट दिली. तसेच पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले, परंतु ते थोड्या अंतरावर जाऊन तिथेच घुटमळत होते. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.

Related Stories

महिलांची स्पेशल बस टॉप गिअरवर; 15 दिवसांत 5500 महिलांनी घेतला लाभ

Abhijeet Khandekar

अभिनेत्रीचा खून अनैतिक संबंधांतून झाल्याचे उघड

Abhijeet Shinde

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

हॉटेलच्या उधारीसाठी सदाभाऊंना भर रस्त्यात अडवलं

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.25 % वर

Rohan_P

फिलिपिन्स : कॅटॅन्डुआस बेटाला गोनी चक्रीवादळाचा तडाखा

datta jadhav
error: Content is protected !!