Tarun Bharat

Sangli; आटपाडीत तीन घरफोड्या

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी पोलीस निवासस्थानालगतच कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या अरूणोदय या इमारतीमधील तीन घरे चोरट्य़ांनी फोडली. यात सुमारे 4 लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. प्रसिध्द मंडप कॉन्ट्रक्टर, एक ग्रामसेवक व एका शिक्षकाचे घर फोडुन चोरटय़ांनी हात साफ केला.

आटपाडी कोर्टाच्या पाठीमागील बाजुस व पोलीस निवासस्थानालगत असलेल्या गोरख खंडु गायकवाड यांच्या अरूणोदय इमारतीमध्ये तीन भाडेकरू व ते स्वतः असे चार कुटुंब वास्तव्यास आहेत. गोरख गायकवाड यांच्यासह अन्य दोन कुटुंब घरांना कुलुप लावुन बाहेरगावी गेले होते. तर गोरख गायकवाड हे आपल्या पुजारवाडी येथील घरी रात्री मुक्कामी होते.

रविवारी मध्यरात्री या इमारतीत चोरट्य़ांनी प्रवेश केला. या इमारतीत एकमेव असलेल्या देशमुख दुध संघाचे अधिकारी अशोक दौंड यांच्या घराला बाहेरून कुलुप घालुन चोरटय़ांनी गोरख गायकवाड, ग्रामसेवक स्वप्निल ढोले, शिक्षक निलेश डिगोळे यांची तीन घरे फोडली. गायकवाड यांच्या घरातून 73 हजार रूपये रोख, 20 ग्रॅम सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठय़ा, कानातील टॉप्स, महालक्ष्मी हार, सोन्याचे गंठण, नेकलेज, मंगळसुत्र, कानातील वेल जोड, पैंजन असा तब्बल 3 लाख 71 हजारांचा ऐवज लंपास केला.

ग्रामसेवक स्वप्निल ढोले यांच्या घरातून रोख रक्कम, चांदीची मुर्ती व दागिने लंपास करण्यात आले. चोरीची ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजता उजेडात आली. अशोक दौंड यांनी माहिती दिल्यानंतर गोरख गायकवाड यांनी घराकडे धाव घेतली असती घरातील साहित्य, बेडमधील साहित्य अस्ताव्यस्त टाकुन चोरटय़ांनी चोरी केल्याचे उजेडात आले. तर ग्रामसेवक ढोले हे देखील गावाहुन सोमवारी सकाळी आल्यानंतर त्यांनाही घर फोडल्याचे निदर्शनास आले. तर निलेश डिगोळे हे लग्नासाठी बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून चोरीला गेलेल्या साहित्याचा तपशील मिळाला नाही.

आटपाडी पोलीस निवासस्थानालगतच चोरट्य़ांनी केलेल्या धाडसी घरफोडीने खळबळ माजली आहे. यापूर्वी आटपाडीसह तालुक्यात घडलेल्या चोरीच्या घटनांनी आटपाडी पोलीसांना आव्हान दिले होते. पोलिसांनी दौलुशा पवार(सोमेश्वरनगर आटपाडी), अमोल पवार(मापटेमळा, आटपाडी) कस्तुरबाई लोखंडे(सोनारी, जि.उस्मानाबाद) व भोजलिंग तुपे (पानवण, जि. सातारा) या चार चोरटय़ांनी केलेल्या 4 घरफोडय़ा, चोऱया उजेडात आणल्या होत्या. आत्ता पुन्हा पोलीसांच्या निवास स्थानालगतच चोरट्य़ांनी घरफोडय़ा करून नवे आव्हान दिले आहे.

Related Stories

‘मंदीरे सुरू करा’ या मागणीसाठी भाजपचे राज्यभरात शंखनाद आंदोलन

Tousif Mujawar

शाहू विचार जागर यात्रा बहुजनांसाठी दिशादर्शक : श्रीमंत शाहू छत्रपती

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात वैद्यकीय वापरासाठी 80 % ऑक्सीजन पुरवठा आवश्यक

Tousif Mujawar

संसदेत गदारोळ घालणाऱ्या तृणमूलच्या सहा खासदारांचं निलंबन

Archana Banage

मिरजेत कोरोनाचा कहर, रुग्ण संख्या शतकाच्या उंबरठ्यावर

Archana Banage

“आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत…”; तालिबानच्या दाव्यावर अहमद मसूदची प्रतिक्रिया

Archana Banage