वसगडे / वार्ताहर
सांगली-नांद्रे-वसगडे-पलूस मार्गावरील फकीरवाडी कडे जाणार्या रस्त्याजवळील बाभळीचे झाड काेसळल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.
वसगडे -सांगली मार्गावर नाद्रे हद्दीत दुपारी दोन वाजताच्या सुमारास येथील येरळा नदीवरील पुलाजवळील रस्ता कडेला असलेल्या बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ताच्या दोन्ही बाजूला वाहतूकीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. झाड उन्मळुन पडताना काेणतीही जिवीत हानी झाली नाही.