दत्ता नरळेकडून संग्राम पाटील चितपट; स्थानिक मल्लांचे नेत्रदीपक विजय
सांगरूळ / वार्ताहर
येथील खाडे तालीम मंडळ व श्री जोतिर्लींग यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानात प्रथम क्रमाकांच्या लढतीत मुंबई महापौर केसरी भारत मदने (बारामती) यांने उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर (गंगावेश ) याचेवर बॅक थ्रो डावावर एकाच मिनिटात प्रेक्षणीय विजय मिळवला .तर नवी मुंबई महापौर केसरी पैलवान दत्ता नरळे गंगावेश यांने महाराष्ट्र चॅम्पियन संग्राम पाटील आमशी) याच्यावर पाचव्या मिनिटाला घुटना डावावर चटकदार विजय मिळवला .पहिल्या दोन्ही कुस्त्या प्रेक्षणीय व निकाली झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पै .विशाल बनकर व पै. भारत मदने यांच्यातील कुस्तीला रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी आमदार प्रा.जयंत आसगावकर , काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक बाळासाहेब खाडे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला .सलामीलाच आक्रमक होत पैलवान भारत मदने याने विशाल बनकरचा एकेरी पट काढत ताबा घेण्याचा प्रयत्न केला .त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न विशाल बनकर करत असतानाच भारत मदनेने बॅक थ्रो मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी होताच क्षणाचीही उसंत न घेता चपळाईने भारत मदने याने दुसऱ्यांदा बॅक थ्रो डावावर विशाल बनकरवर चितपट विजय मिळवला . विजयी भारत मदनेला भैया चषकासह रोख इनाम देऊन सन्मानित करण्यात आले.
पै दत्ता नारळे व पै संग्राम पाटील यांच्यातील द्वितिय क्रमांकाची लढतही प्रेक्षणीय झाली .सलामी झडताच संग्रामने धोबी भारत दत्ताचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला .दत्ताने हा प्रयत्न धुडकावून लावत संग्रामचा ताबा घेतला आणि त्याच्यावरती पाचव्या मिनिटाला घुटना डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला .विजयी दत्ता नरळे याला आबाजी व बाऊचकर चषकासह रोख इनाम देऊन गौरविण्यात आले .तृतीय क्रमांकच्या लढतीत पै . सरदार सावंत (आमशी )यांने महाराष्ट्र चॅम्पियन पै . कुमार पाटील (मोतीबाग ) याच्यावरती हप्ते डावर विजय मिळवला .चार नंबरच्या लढतीत पै .जयदीप पाटील (गंगावेश ) याने महाराष्ट्र चॅम्पियन इंद्रजीत मगदूम (इचलकरंजी ) याचेवर विजय मिळविला.
आर्यन पाटील ( वाकरे) अनिरुद्ध पाटील (आमशी ) पै . बाबा रानगे (आरे ) पै . इंद्रजीत मोळे (घरपण ) पै .विनायक वास्कर (मोतीबाग ) पै कुणाल देवकर (शाहूपुरी ) पै. पवन देसाई (भामटे ) पै नवनाथ कुंभार (म्हारुळ ) पै. पृथ्वीराज पाटील (आमशी ) पै. विनायक मोळे (घरपण ) यांनी चटकदार कुस्त्या करून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर प्रेक्षणीय विजय मिळवले. स्थानिक मल्ल पै साई सुतार, पै धैर्यशील लोंढे, पै केदार खाडे, पै अमर खाडे, पै .सागर कासोटे, पै अनुज घुंगुरकर ,यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर प्रेक्षणीय विजय मिळवत प्रेक्षकांची मने जिंकली .
या कुस्ती मैदानात नूतन महाराष्ट्र केसरी पै पृथ्वीराज पाटील याचा संयोजन कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे उपमहाराष्ट्र केसरी संभाजीराव पाटील, रवींद्र पाटील, बाबुराव दांडगे,गुंडाजी पाटील सरपंच सदाशिव खाडे उपसरपंच सुशांत नाळे ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते खाडे तालीम मंडळ व जोतिर्लिग यात्रा कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पंच म्हणून पै . सर्जेराव पाटील पै बाबा शिरगांवकर (कोपार्डे ) रघुनाथ मोरे ( वाकरे ) विलास पाटील (खुपिरे ) सर्जेराव पाटील पै .राजाराम पाटील पै .प्रकाश पाटील (आमशी ) पै तानाजी पाटील (वाकरे) यांनी काम पाहिले पै .यशवंत पाटील (दोनवडेकर ) दीपक वरपे (म्हाळुंगे ) सुहास खाडे निलेश सुतार यांनी निवेदन केले .