ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Sania Mirza announces her retirement from tennis भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती शेवटचा सामना खेळणार असल्याचे तीने जाहीर केले आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये झालेल्या सामन्यात बुधवारी सानिया मिर्झाला पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर आज तिने आपली व्यावसायिक कारकीर्द संपविण्याची घोषणा केली. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पयिनशिपमध्ये ती शेवटचा सामना खेळणार आहे. सानियाने म्हटले आहे की, मला वाटते मी अधिक चांगली खेळू शकते. पण शरीर त्यापद्धतीने साथ देत नाही. हा माझ्यासाठी मोठा सेटबॅक आहे. मी आता माझी व्यावसायिक कारकीर्द पुढे न नेण्याचा विचार केला आहे.
अधिक वाचा : …तर माझ्यावर केसेस दाखल करा; अजित पवारांचे फडणवीसांना आव्हान
सानिया मिर्झाने 2003 मध्ये प्रो-टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. 20 वर्षांच्या खेळाच्या कारकीर्दीत सानियाला भारत सरकारने 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2015 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.