Tarun Bharat

स्वच्छता निरीक्षकांकडे बंदोबस्ताची जबाबदारी

रविवारी झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन अधिकाऱयांना आली जाग

प्रतिनिधी /बेळगाव

कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने करूनही मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून लहान मुलांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. रविवारी घडलेल्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाचे अधिकारी जागे झाले आहेत. भटक्मया आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

शहर व उपनगरात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढल्याने धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक रस्त्यांवर भटकी कुत्री ठाण मांडून बसत असल्याने रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. खुल्या जागा तसेच कचराकुंडीच्या ठिकाणी ठाण मांडून बसत असलेली कुत्री लहान मुलांवर हल्ले करीत असल्याचे निदर्शनास आले आहेत. भटक्मया कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जाते. पण याकडे महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. महापालिका अधिकाऱयांची भेट घेऊन भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली होती. पण महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे.

कुत्री-डुकरांचा बंदोबस्त करण्याची सूचना

महापालिकेच्या अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. प्रत्येक गल्लीत व कचराकुंडीजवळ ठाण मांडून बसणारी भटकी कुत्री लहान मुलांवर हल्ले करीत आहेत. रविवारी काकतीवेस येथे घडलेल्या घटनेत बालिका जखमी झाली आहे. काकतीवेस परिसरात भटक्मया कुत्र्यांचा वावर वाढला आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण महापालिकेच्या अधिकाऱयांनी कोणतीच कारवाई हाती घेतली नाही. केवळ नसबंदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार चालविला आहे. मात्र रविवारी काकतीवेस येथे घडलेल्या घटनेनंतर मनपाच्या अधिकाऱयांना जाग आली आहे. भटक्मया, पिसाळलेल्या कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करण्याची सूचना स्वच्छता निरीक्षकांना महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमधील स्वच्छता निरीक्षकांनी या भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक कारवाई करावी, असा आदेश बजाविण्यात आला आहे.

यावेळी तरी कारवाई होणार का?

सध्या भटक्मया कुत्र्यांनी हैदोस मांडला असून मागील तीन वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही झाली नाही. मात्र आतादेखील महापालिकेच्यावतीने पुढील महिन्यापासून भटक्मया कुत्र्यांच्या नसबंदीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. पण यावेळी तरी ही कारवाई होणार का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Related Stories

लोककल्प फौंडेशनतर्फे चापोलीत मोफत आरोग्य शिबिर

Amit Kulkarni

सोने-चांदीच्या अलंकारांनी सजणार गणराया

Amit Kulkarni

अलतगा शाळेसमोरील ती झाडे हटवा

Patil_p

देशांतर्गत प्रवासात बेळगाव विमानतळ 15 व्या स्थानी

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात शुक्रवारी 304 जणांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

हिंडलग्याच्या कंत्राटदाराची उडुपीत आत्महत्या

Omkar B