Tarun Bharat

संजय पांडे दीड महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणार

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (cp sanjay pandey) यांना दीड महिन्यात शिवसेनेत (shivsena) प्रवेश करायचा आहे. त्यामुळे त्यांनी माझा एफआयआर नोंदवून न घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. आम्ही यासंदर्भात राज्यपालांकडे जाऊ आणि गरज पडल्यास आम्ही हे प्रकरण घेऊन उच्च न्यायालयातही जाऊ, असे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somiya) यांनी म्हटले आहे. 

23 एप्रिल रोजी शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात गेलेल्या सोमय्यांचा FIR पोलिसांनी दाखल करून घेतला नव्हता. त्यानंतर सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा बनावट FIR दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावरून आता भाजपा आक्रमक झालं असून पक्षाचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासोबत गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, मंगल प्रसाद लोढा, सुनील राणे हे देखील राज्यपालांची भेट घेणार आहेत. 

Related Stories

मराठा आरक्षण : राज्याची पुनर्विचार याचिका २४ रोजी

Archana Banage

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्टला

Archana Banage

राज ठाकरेंना सरकार घाबरले, काँग्रेस नेत्याचा महाविला घरचा आहेर

Rahul Gadkar

दुकानाच्या बाहेरून खरेदी करा

Patil_p

अजित पवारांनी सांगितले शरद पवार आणि प्रशांत किशोर भेटीमागील कारण

Archana Banage

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दसरा चौकात चैत्र पाडवा महामेळावा

Abhijeet Khandekar