Tarun Bharat

संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या, CBI कडून 3 गुन्हे दाखल

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील निवासस्थानी आज सकाळी सीबीआयने छापे टाकले. मुंबईत जवळपास 9 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. याचदरम्यान, सीबीआयने पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. (Sanjay Pandey’s problems increased, 3 cases filed by CBI)

एनएससी घोटाळय़ाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर पांडे यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या अनुषंगाने आज सीबीआयने पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरांवरदेखील छापेमारी सुरू केली आहे. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 2009 ते 2017 या काळात शेअर मार्केटमधील कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयनं संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संजय पांडे यांनी 2001 मध्ये एक आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. त्यादरम्यान पांडे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारल्याने ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. 2010 आणि 2015 च्या दरम्यान पांडे यांच्या या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रक्ट देण्यात आले होते. पण या कंपनीने एनएसई सर्व्हरशी छेडछाड केली. शेअर मार्केटमधील कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आले. याचा तपास करण्यासाठी सीबीआय 2018 पासून एनएसई लोकेशन घोटाळा प्रकरणाचा तपास करत आहे. यापूर्वी मार्चमध्ये संजय पांडे यांची सीबीआयने जवळपास 6 तास चौकशी केली होती.

हेही वाचा : ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता KDMC मध्येही सेनेला खिंडार

Related Stories

अनिल परबांच्या अडचणी वाढणार ! सदानंद कदमांना ईडीचं समन्स

Archana Banage

‘सागरमाला’तून अर्थव्यवस्थेला चालना

datta jadhav

त्रिशंकू शाहूनगर, विलासपूरचा पाणीप्रश्न कायमचा सुटला

Patil_p

पोलीस अन् भाजपा वीजकार्यकर्त्यांमध्ये झटापट

Archana Banage

…अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल : छगन भुजबळ

Tousif Mujawar

मुंबईतील थंडीला ढगाळ वातावरणाचा खोडा

datta jadhav