ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोड (Sanajy Rathod) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरातून शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून शिवसैनिक आता रस्त्यावर उतरले आहेत.
संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झालेत. कोल्हापुरात देखील शिवसैनिक आक्रमक झाले असून मंत्री संजय राठोड आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत शिंदे सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी संप्पन्न; एकूण १८ जणांनी घेतली शपथ
ठाकरे सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार धरण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपच्या मागणीनंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता तर टीईटी घोटाळा प्रकरणात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत होती. दोन्ही नेत्यांवर आरोप असताना मंत्रिपद दिल्याने शैवसिनिक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, या दोन भ्रष्ट नेत्यांनाच मंत्री केल्याने शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्याचा निषेध व्यक्त करत आहेत कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शिंदे सरकारने अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी आज दिला.