संभाजीराजे यांनी सहाव्या जागेवर दावा सांगत सर्वांचा पाठिंबा मागितला यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान काल शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी दोन उमेदवार जाहीर करत संभाजीराजे यांचा पाठिंबा काढून घेतला. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज ट्विट करत संभाजीराजे यांना इशारा दिला आहे.
शिवसेना राज्यसभेची सातवी जागा लढवेल आणि जिंकून सुद्धा येईल यात कोणी कितीही आकडेमोड करावी. आकडे आणि वेळ हे दोन्हीही महाविकास आघाडीकडे आहे असा इशारा संभाीजीराजे यांना राऊतांनी दिला. यावरून संभाजीराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत काय म्हणाले
संजय राऊत ट्विट करत म्हणतात, राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल?सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे असा इशारा राऊतांनी दिला आहे.
छत्रपतींच्या नावाने राजकारण करीत आलेली शिवसेना आज छत्रपतींनाच डावलत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत चांगलाच रोष पाहायला मिळत आहे. यावर शिवसेना काय भूमिका घेते. संभाजीराजे यांच्यासाठी जागा सोडण्याचे उदारपण दाखवते की महाराष्ट्राच्या जनतेचा रोष ओढवून घेते हे पाहावे लागणार आहे.
Trending
- जिल्ह्यात सीईटी परीक्षा सुरळीत
- इंडालनजीक खासगी आराम बसला अपघात, पाच जण जखमी
- हिरेमठाच्या स्वामीजींची हुबळीतील ‘त्या’ विद्यार्थिनीच्या निवासाला भेट
- हुबळीतील विद्यार्थिनीच्या खुनाचा अभाविपतर्फे निषेध
- जनतेने विश्वास ठेवून दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी द्यावी
- खादरवाडीत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
- ओलमणी येथील गटारीतील कचरा उचल करण्याकडे ग्रा. पं. चे दुर्लक्ष
- मतदान जागृतीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन