Tarun Bharat

राज्य कसं चालवावं हे ठाकरेंकडून शिका; डायलॉगबाजी करत संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राजकारणात काहींना घमेंड आली आहे. राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र जिंकला आहे असं होत नाही. तेरा घमंड चार दिन का है पगले असे डायलॉगबाजी करत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjya Raut) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावेळी अग्निपथ योजनेवर (Agneepath Scheme)त्यांनी टीकेचे बाण सोडले. शिवसेनेचा (Shivsena)आज 56 वा वर्धापन दिन आहे. वेस्ट इनमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत हे बोलत होते.

आज फादर्स डे आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे हिंदुत्वाचे बाप आहेत. राज्यांमध्ये अन्यायाविरोधात ठिणगी टाकण्याचं काम त्य़ांनी 56 वर्षापूर्वी केलं. अब तक छप्पन और भी आगे जायेंगे असे डायलाॅगबाजी करत भाजपावर निशाणा साधला. पुढे बोलताना ते म्हणाले, सेनेचे हिंदुत्व अयोध्येत सर्वांनी पाहिलं. बाळासाहेब ठाकरेंचा नातू अयोध्येत आला आहे. त्याचा सन्मान झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन आदित्य ठाकरे यांना सर्वांना आशीर्वाद दिला.

हेही वाचा- शिरवळ जवळील अपघातात कोल्हापूरचा एक वारकरी ठार; 30 जखमी

उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) मुख्यमंत्री असल्याने महाराष्ट्रात शांतता आहे. कट कारस्थान करून काही होणार नाही. महाराष्ट्रात आमचीचं सत्ता राहील असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. सेनेच्या अंगावर राणा, काणा असे खूप जण सोडलेत. पण शिवसेनेचा स्वाभिमानी, राष्ट्रीय, मराठी, अन्याया विरुध्द लढण्याचा बाणा सगळ्यांच्या छाताडावर पाय ठेवून उभा आहे. आज जे टिरटीर करत आहेत ते भविष्यात शिवसेनेच्या पायाशी असतील असा इशारा यावेळी त्यांनी दिला. शिवसेना ईडीला घाबरत नाही. अंगावर आला तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवून लावू अशी महाराष्ट्राची माती आहे असेही ते म्हणाले.

हेही वाचा- स्वाभिमानी शेतकरी संघटना दरोडेखोर आणि खंडणीखोरांची-सदाभाऊ खोत

अग्निपथ योजनेविषयी बोलताना ते म्हणाले, अग्निपथमुळे संपूर्ण देश पेटला आहे. असा मूर्ख निर्णय याआधी कोणी घेतला नाही. कंत्राट पद्धतीने गुलाम नेमले जातात सैनिक नाही. तुघलकानं देखिल असा निर्णय घेतला नसता असा हल्लाबोल त्यांनी केला.

Related Stories

जमात ए इस्लामी हिंद च्या कार्यक्रमाला संजय राऊत राहणार उपस्थित

prashant_c

पुंछमधील चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद

datta jadhav

National Doctor’s Day 2021: पीएम मोदी दुपारी 3 वाजता डॉक्टरांना करणार संबोधित

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजीतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने रिक्षाने ठोकली धूम

Abhijeet Shinde

“ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना काय समजणार”

Sumit Tambekar

राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेतला रौप्यपदक; भारताचा विजयारंभ

datta jadhav
error: Content is protected !!