Tarun Bharat

राऊतांचा फडणवीसांना सल्ला; म्हणाले, फंद्यात पडू नका…

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

राष्ट्रीय कार्यकारणी कोणत्याही पक्षासाठी खूप महत्त्वाची असते.आजच्या बैठकीत मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. आज अनेक नियुक्त्या केल्या जाणार आहेत. शिवसेनेसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. शिवसेना एक राजकीय पक्ष आहे तो कोणी हायजॅक करू शकत नाही. पैसा आहे म्हणून कोणीही काहीही करू शकत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. हि शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आहे. ते नेहमी म्हणायचे, हजारो शिवसैनिक माझ्यामागे आहेत म्हणून मी प्रमुख आहे. पक्ष विस्तारासाठी आमच्याकडे मोठी संधी आहे. आजची कार्यकारणीची बैठक महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारी आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणीसांवरही टीकास्त्र सोडले.

एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे याविषयी बोलताना ते म्हणाले, सुरक्षा ही आमदाराला असते संपूर्ण कुटुंबाला नाही. एकनाथ शिंदे ढुंगणाला पाय लावून पळून गेले आहेत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. त्यांनी महाराष्ट्रात परत यावं. राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी? वाघ म्हणवता मग बकरी सारखे का वागता असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. शिवसैनिकांचा अजून विस्फोट झालेला नाही. संयम राखण्याच्या शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहेत असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, फडणवीसांनी या फंदात पडू नये.भाजपाची उरलीसुरली प्रतिष्ठा यात ते गमावून बसतील असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीची ही त्यांनी यावेळी आठवण करून दिली.

Related Stories

हॉटेल आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून देण्याबाबत अस्लम शेख म्हणाले…

Rohan_P

कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक

datta jadhav

Sangli; छत्रपतींच्या चरणी अखंड ‘शिवज्योत’ प्रज्वलित..देशातील पहिलाच उपक्रम

Abhijeet Khandekar

कोरोनाच्या 3 लाटेचा मुकाबला करण्यासाठी 5 हजार आरोग्य सहकर्मचारी तयार करणार दिल्ली सरकार

Rohan_P

बंगालमध्ये भाजपचा रडीचा डाव : शरद पवार

Abhijeet Shinde

वाळवा येथील वीज कंपनीचे शाखा अभियंता कुलकर्णी वादाच्या भोवऱ्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!